युट्युबवरील व्हिडिओ पाहून सोनसाखळी चोरी करणारी टोळी जेरबंद

युट्युबवरील व्हिडिओ पाहून सोनसाखळी चोरी करणारी टोळी जेरबंद

पुणे पोलीस

युट्युबवर सोनसाखळी चोरीचे विडिओ बघून चोरी करणाऱ्या टोळीला वाकड पोलिसांनी जेरबंद केलं आहे. व्यवसायातील अपयशामुळे त्यांनी हे चोरीचे पाऊल उचल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ते गेल्या दीड महिन्यांपासून सोनसाखळी चोरी करायचे. त्यांच्याकडून ऐकून ३ लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. याप्रकरणी तिघांना वाकड पोलिसांनी जेरबंद केलं आहे. महमद आरिफ उस्मान अली सय्यद, आयुब रियासत अली, फहिम मतीन सिद्दीकी अस आरोपीची नावे असून हे सर्व मूळ उत्तर प्रदेश येथील आहेत.

व्यवसायात अपयश आल्यामुळे निवडला चोरीचा मार्ग

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी महमद आरिफ उस्मान अली सय्यद आणि इतर दोन आरोपी हे गेल्या काही वर्षांपासून काच विक्रीचा व्यवसाय करतात परंतु, व्यवसायात अपयश आले होते त्यांना कामाचा ठेका मिळत नसल्याने तिघांनी सोनसाखळी चोरि करण्याचे ठरवले. यासाठी प्रशिक्षण म्हणून युट्युबवर सोनसाखळी चोरीचे विडिओ पाहून चोरी कशी करायची ते अभ्यास केला आणि ते प्रत्येक्षात उतरवत वाकड परिसरात त्यांनी पाच सोनसाखळी चोरीचे गुन्हे केले.

First Published on: February 8, 2019 8:25 PM
Exit mobile version