खाकीला सॅल्युट ! कॉन्स्टेबलचे २० वर्षात ५० हजार बेवारसांचे अंत्यसंस्कार

खाकीला सॅल्युट ! कॉन्स्टेबलचे २० वर्षात ५० हजार बेवारसांचे अंत्यसंस्कार

अवघ्या २४ तासांमध्ये वेगवेगळ्या कारणामुळे मृत्यूमुखी पडलेले १२ मृतदेह येतात, पण संपुर्ण दिवसाची ड्युटी केल्यानंतरही ज्ञानदेव वारे थकत नाहीत. त्या सगळ्या बेवारस मृतदेहांचे अंत्यसंस्कार कोणतीही कुरबुर न करता त्या सर्व मृतदेहांचा अंत्यसंस्कार करणारी व्यत्ती म्हणजे ज्ञानदेव वारे. मग दिवसभरात कितीही मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणे असो, अतिशय मेहनत करून या सगळ्या मृतदेहांचा अंत्यसंस्कार केल्यानंतरच ते आपल्या चेंबूरच्या घरी पोहचतात. अनेकदा दमलेले, घामाघूम झाल्यावर अगदी मध्यरात्रीही घरी परतल्यानंतर त्यांच्यासोबत एक समाधान असते. या अनोळखी, बेवारच मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणारे वारे म्हणतात, की यामधून मला समाधान मिळते आणि पुणयही.

गेल्या दोन दशकांपासून मुंबई पोलिसांच्या सेवेत शववाहिनीसाठी काम करणारे ज्ञानदेव वारे यांनी गेल्या २० दिवसांमध्ये ५० हजार मृतदेहांची विल्हेवाट लावली आहे. मुंबईतील अशी कोणतीही घटना नाही ज्यामध्ये वारे यांनी योगदान दिलेले नाही. कोरोनाच्या महामारीच्या संकटातही वारे थोडावेळही थांबले नाहीत. त्यामुळेच नुकताच पोलिस विभागाने त्यांचा गौरव केला आहे. टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने याबाबतची एक बातमी प्रसिद्ध केली आहे.

covid-19 च्या दुसऱ्या लाटेनंतर त्यांचे कुटूंबीय अतिशय चिंतेत असते. वारे यांना सहव्याधी आहेत. पण या कोरोनाच्या संकटकाळातही त्यांनी आपले काम अविरत सुरूच ठेवले आहे. बेवारस अशा ५० हून अधिक मृतदेहांवर मी गेल्या वर्षभरात अंत्यसंस्कार केले आहेत. हे सगळे मृतदेह कोरोनाने मृत्यू झाले होते. रोजच्या पोलिस स्टेशनमधील ड्युटीपेक्षा मला हे अंत्यसंस्काराचे काम अधिक समाधान देणारे असते. मुंबई पोलिस दलात १२ झोनमध्ये १२ शववाहिन्या होत्या. कालांतराने या शववाहिन्यांमध्ये घट होत, आता अवघ्या ३ शववाहिन्या शिल्लक आहेत. वारे हेदेखील शववाहिनीसाठीचे चालक आहेत. मुंबईतल्या सर्वाधिक वर्दळ असलेल्या सायन, जे जे हॉस्पिटल, नायर, जीटी, सेंट जॉर्ज आणि शिवडीच्या टीबी हॉस्पिटलमधून ते मृतदेह आणत त्यावर अंत्यसंस्कार करतात.

जेव्हा दक्षिण मुंबई किंवा मध्य मुंबईत एखादा अनोळखी मृतदेह आढळतो तेव्हा पहिला कॉल हा वारेंना येतो. पोलिसांकडून पहिला कॉल हा वारेंनाच करण्यात येतो. आपल्यासोबत दोन कामगारांना घेऊन ते मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी घेऊन जातात. पोलिस हा मृतदेह हॉस्पिटलला घेऊन जातात. त्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार होतात. त्यानंतर १५ दिवस हा मृतदेह शवागृहात ठेवण्यात येतो. जेव्हा कोणीच या मृतदेहांच्या शोधात येत नाही, तेव्हा वारेंना बोलावण्यात येते आणि मृतदेहावर संस्कार करण्यासाठी त्यांना सांगण्यात येते. जर मृतदेहाचा वारस सापडला तर त्यांच्या उपस्थितीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येतात. एखाद्या आपल्या कुटूंबीयासाठीच कराव्यात तसेच सर्व अंत्यसंस्कार हे वारेंकडून करण्यात येतात.

पोलिस दलात ज्या कॉन्स्टेबलची ५ वर्षे शववाहिनीवर ड्युटी झाली, त्यांना पोलिस दलात बदली देण्यात येते. पण १९९५ मध्ये पोलिस दलात रूजू केल्यानंतर २००१ पासून त्यांनी हे मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे काम थांबवलेच नाही. मृतदेहाला अग्नी देण्यापासून ते प्राथर्नेपर्यंत सगळ काही वारे नित्यनियमाने करतात. पोलिस दलानेही त्यांच्या कामातील चांगुलपणा पाहूनच १९९५ पासून सातत्याने त्यांनी शववाहिनीच्या ड्युटीसाठीचे काम कायम ठेवले आहे. मला निवृत्तीही हेच काम करताना घ्यायची आहे, असे वारे सांगतात. हे काम खूपच आव्हाने आहेत. मला या कामात समाधान मिळते खरे, पण त्याचवेळी कागदोपत्री कारभारही डोळ्यात तेल घालून करावा लागतो. चुकीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होणार नाहीत आणि वेगळ्या व्यक्तीचा मृतदेह ताब्यात येणार नाही याची दक्षता घ्यावी लागते असेही ते म्हणाले. याच सातत्याने प्रामाणिकपणे केलेल्या कामासाठी सहआयुक्त कायदा आणि सुव्यवस्था विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला आहे. या संपुर्ण कामाबाबाबत त्यांच्या पत्नीलाही वारे यांचा अभिमान आहे. त्यामुळेच या धकाधकीच्या कामात दोन घास वेळेत खाता येतील यासाठी त्यांनीही दररोज डबा पुरवून या कामामध्ये एकप्रकारे योगदान दिल्याचेही त्यांच्या पत्नी सांगतात.


 

First Published on: May 18, 2021 7:50 PM
Exit mobile version