नितीन गडकरींच्या घरासमोर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला, काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

नितीन गडकरींच्या घरासमोर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला, काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

नितीन गडकरींच्या घरासमोर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला, काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरातील घराबाहेर पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. घरासमोर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. बुधवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी राज्यभरात आंदोलन केले होते. मुंबईतही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले होते. आता नागपूरमध्येही कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे पोलीस सज्ज झाले आहेत.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा काँग्रेसकडून देण्यात आला आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. गडकरींच्या घरासमोरील सध्याचे वातवारण तणावाचे झाले असून मोठ्या संख्येने पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. आंदोलन भडकू नये यासाठी पोलिसांकडून काळजी घेण्यात येत आहे. पोलिसांकडून घराच्या परिसरात बॅरिकेट्स लावले असून या ठिकाणी छावणीचे रुप प्राप्त झाले आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपुरमध्ये नाहीत. परंतु भाजप कार्यकर्ते त्यांच्या घराजवळ जमत आहे. अद्याप काँग्रेसचा मोर्चा घराच्या ठिकाणी आला नाही. काँग्रेस कार्यकर्त्यांचे आंदोलन घरापर्यंत आल्यास दोन्ही पक्ष आमने-सामने येऊन मोठा वाद निर्माण होऊ शकतो. भाजप कार्यकर्त्यांकडून गडकरींच्या घरासमोरुन घोषणाबाजी देण्यास सुरुवात झाली आहे. महिला पोलिसांनाही मोठ्या संख्येने या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे.

मोदीजी माफी मांगो काँग्रेसची घोषणाबाजी

महाराष्ट्रात काँग्रेस कार्यकर्त्यांनी बुधवारी आंदोलन केले होते. राज्यातील भाजप कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला कोरोनाचा सुपर स्प्रेडर म्हटलं आहे. तसेच काँग्रेसवरसुद्धा टीकास्त्र डागलं आहे. याविरोधात काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली आहे. मोदींनी महाराष्ट्राचा अपमान केला असून त्यांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. मोदीजी माफी मांगो अशा घोषणा आंदोलनादरम्यान देण्यात आल्या आहेत.


हेही वाचा : महाराष्ट्राच्या नद्यांमध्ये मृतदेह फेकले नाहीत, राऊतांचा महाराष्ट्राला सुपरस्प्रेडर ठरवणाऱ्यांवर संताप

First Published on: February 10, 2022 11:53 AM
Exit mobile version