Refinery Project: माध्यमांनंतर ठाकरे गटाच्या नेत्यांनाही बारसूला जाण्यापासून पोलिसांची अडवणूक

Refinery Project: माध्यमांनंतर ठाकरे गटाच्या नेत्यांनाही बारसूला जाण्यापासून पोलिसांची अडवणूक

रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू या ठिकाणी रिफायनरी विरोधात ग्रामस्थांकडून तीव्र आंदोलन केलं जातंय. यावेळी काही महिलांना अटक देखील करण्यात आली होती. तसेच या ठिकाणी जाण्यास माध्यमांना देखील पोलिसांकडून बंदी घालण्यात आली होती. मात्र, आता माध्यमांनंतर ठाकरे गटाच्या नेत्यांनाही बारसूला जाण्यापासून पोलिसांनी अडवणूक केली. रानतळे चेकपोस्टवर खासदार विनायक राऊत यांची गाडी अडवण्यात आली. बारसू येथे कलम १४४ केल्यामुळे पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली.

विनायक राऊतांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, भूमीपुत्रांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न सरकार करत असेल तर आम्ही याचा जाब विचारण्यासाठी सक्षम आहोत. काल रात्री दीड वाजताच्या सुमारास पकडून नेण्यात आलेल्या महिलांना वाऱ्यावर सोडलं. त्यांनी आवाज उठवल्यानंतर त्यांना त्यांच्या घराजवळ सोडण्यात आलं, असं खासदार विनायक राऊत म्हणाले.

विनायक राऊत यांच्यासोबत ठाकरे गटाचे नेते आणि आमदार वैभव नाईक यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. ते बारसू येथील स्थानिकांच्या भेटीला निघाले होते. राज्य सरकारच्या भूमिकेवरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत.

कोकणातील बेरोजगारीच्या मुद्द्यावर प्रकल्पाला समर्थनच….माझ्या विरोध करणाऱ्या नागरिकांना प्रकल्पाची बाजू पटवून प्रशासनाने द्यावी, त्यांच्यावर अन्याय करू नये, अशी मागणी राजन साळवी यांनी केली आहे.


हेही वाचा : 308 गृहनिर्माण प्रकल्पांवर नादारी दिवाळखोरीची टांगती तलवार


 

First Published on: April 26, 2023 2:19 PM
Exit mobile version