मदत करायला गेले आणि पोलिसालाच धुतले

मदत करायला गेले आणि पोलिसालाच धुतले

पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी पोलीस ठाण्याच्या परिसरात पोलीस कर्मचाऱ्यालाच एका गुंडाने धक्काबुकी करत शिवीगाळ केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी राकेश आवळे मारेकऱ्याविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेमंतकुमार गुत्तीकोंडा या पोलीसाना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली आहे.

नेमके काय घडले?

पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी या ठिकाणी गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास पोलीस कर्मचारी गुत्तीकोंडा हे साई चौकातील हॉटेलमध्ये जेवण करत होते. त्यावेळी आरोपी राकेश आवळे रक्ताच्या थारोळ्यात बाहेर पडल्याचे त्यांना दिसले. तेव्हा गुत्तीकोंडा हे कर्तव्य बजावण्यासाठी बाहेर आले. या पोलिसांनी राकेश आवळे याला नेमका काय प्रकार झाला आहे याबाबत विचारणा केली. मात्र आरोपीने उलट प्रश्न करत तू कोण आहेस असं म्हणत पोलीस कर्मचारी गुत्तीकोंडा यांना शिवीगाळ केली. शिवीगाळ करत त्यांनी पोलीस कर्मचारी गुत्तीकोंडा यांचे शर्ट पकडले. या झटापटीत पोलीस कर्मचारी गुत्तीकोंडा यांच्या शर्टची बटणे तुटली. परंतु मदत करण्यास गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यालाच धक्काबुक्की केली. हा घडलेला सर्व प्रकार आजूबाजूच्या व्यक्तींने पाहिला आणि त्याला पोलिसाच्या ताब्यात दिले. आरोपी राकेश आवळे याला तातडीने पोलीस ठाण्यात घेऊन गेले. आरोपी राकेश आवळे गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एस.एस सूर्यवंशी हे करत आहेत.

First Published on: October 19, 2018 5:31 PM
Exit mobile version