महाराष्ट्र लोकसेवा आयोगातच पदे रिक्त, पाच हजार मुलाखती रखडल्या

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातच पदे रिक्त, पाच हजार मुलाखती रखडल्या

पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या पाच हजार मुलाखती रखडल्या आहेत. मुलाखती होत नसल्याने दीड ते दोन वर्ष वाया गेली आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर सदस्यसंख्या कमी असल्याने मुलाखती रखडल्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सहापैकी तीनच सदस्य सध्या काम पाहत आहेत.

एमपीएससीची मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी तज्ज्ञांचं पॅनल तयार केले जाते. या पॅनलमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील एक सदस्य सहभागी असतो. सध्या तीनच सदस्य असल्याने केवळ तीचन पॅनल तयार होऊ शकततात. त्यामुळे मुलाखतींना वेळ लागत असल्याची माहिती मिळत आहे.

आधीच पाच हजार उमेदवारांच्या मुलाखती रखडल्या असून आता पुन्हा नव्याने परीक्षा होत आहेत. त्यामुळे या परीक्षांच्या मुलाखतींचीही यात भर पडणार आहे. त्यामुळे सरकारने आयोगाचे सर्व सदस्य भरावेत आणि मुलाखती घ्यावात, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

या पदांच्या मुलाखती रखडल्या?

First Published on: December 15, 2022 3:16 PM
Exit mobile version