Power Generation : राज्यात वीज निर्मितीचा टक्का घसरला, कोराडी औष्णिक प्रकल्पातील संच बंद

Power Generation : राज्यात वीज निर्मितीचा टक्का घसरला, कोराडी औष्णिक प्रकल्पातील संच बंद

राज्यात वीज निर्मितीचा टक्का घसरला

नागपूर : राज्यभरात वातावरणाचा पारा वाढल्याने उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. वाढत्या गर्मीमुळे सर्वत्र पंखे, वातानुकुलीत यंत्रासह विद्युत उपकरणांचा वापर वाढला आहे. त्यामुळे यासाठी विजेची मागणी देखील वाढली आहे. पण राज्यात वीज निर्मिती करणाऱ्या कोराडी औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पातील 660 मेगावॉटचा संच क्रमांक आठ तांत्रिक कारणाने शनिवारी (ता. 04 मे) बंद पडला आहे. ज्यामुळे राज्यातील वीज निर्मितीचा टक्का घसरला आहे. तर वीज निर्मितीची चिंताही सतावू लागली आहे. (Power Generation in state has fallen, set of Koradi thermal plant shut downM)

वाढत्या उकाड्यामुळे राज्यात वीजेची मागणी वाढली आहे. पण ऐन उन्हाळ्यात कोराडीतील 660 मेगावॉटचा संच क्रमांक आठ बॉयलर ट्यूब लिकेजमुळे बंद पडल्याची माहिती समोर आली आहे. कोराडी औष्णिक प्रकल्पातील हा संच बंद पडल्याने या ठिकाणी होणारी वीज निर्मिती सुमारे 600 मेगावॉटने कमी झाली आहे. त्यामुळे रोजच्या 1 हजार 900 मेगावॅटऐवजी सध्या येथे एक हजार 312 मेगावॅटची वीज निर्मिती होत आहे. ज्यामुळे वीज निर्मितीबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा… S. Jaishankar : आता नेपाळची आगळीक; नोटांवर छापणार भारताचा भूभाग; जयशंकर यांचे चोख प्रत्युत्तर

महत्त्वाची बाब म्हणजे, कोराडीतील या संचाच्या दुरुस्ती अद्यापही करण्यात आली नसून अजून काही दिवस या संच दुरुस्तीला लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तर, पुढील दोन दिवसांमध्ये संच क्रमांक आठ सुरू होणार असल्याचा दावा कोराडी केंद्राचे मुख्य अभियंता विलास मोटघरे यांनी केला आहे. पण महावितरणच्या जनसंपर्क विभागाने गरजेनुसार वीज उपलब्ध असल्याचे सांगितले असून वीजेची चिंता करण्याचे कारण नसल्याचे सांगितले आहे.

शनिवारी (ता. 04 मे) राज्यात तापमानाचा पारा वाढला होता. ज्यामुळे शनिवारी वीजेची मागणी वाढली. त्यामुळे या दिवशी सर्वाधिक वीज निर्मिती ही महानिर्मितीकडून करण्यात आली असून 8 आठ हजार 102 मेगावॅटची वीज निर्मिती करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. तर, औष्णिक विद्युत प्रकल्पामधून सात हजार 514 मेगावॅट, उरन गॅस प्रकल्पातून 267 मेगावॅट, कोयना जलविद्युत प्रकल्पातून 255 मेगावॅट, सौरऊर्जा प्रकल्पातून ६० मेगावॅट वीज निर्मिती करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. खासगी प्रकल्पांपैकी अदानीकडून दोन हजार 624 मेगावॅट, जिंदलकडून एक हजार 69 मेगावॅट, आयडियलकडून 164 मेगावॅट, रतन इंडियाकडून एक हजार 347 मेगावॅट, एसडब्लूपीजीएलकडून 445 मेगावॅट वीज निर्मित होत होती. केंद्राच्या वाट्यातून राज्याला नऊ हजार 591 मेगावॅट वीज निर्मिती झाली आहे.

हेही वाचा… Water Crisis: राज्यात भीषण पाणीटंचाई; 2 हजार 344 गावांत 2 हजार 952 टँकर्स


Edited By : Poonam Khadtale

First Published on: May 5, 2024 4:35 PM
Exit mobile version