तळोजा जेलला नका पाठवू, प्रदीप शर्माची कोर्टात विनवणी

तळोजा जेलला नका पाठवू, प्रदीप शर्माची कोर्टात विनवणी

प्रदीप शर्मा

एंटेलिया स्फोटके आणि मनसुख हत्या प्रकरणात दुसऱ्या खेपेत अटक करण्यात आलेल्या प्रदीप शर्मा सह तिघांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी तर इतर दोघांना १ जुलै पर्यत एनआयए कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. दरम्यान मला तळोजा नको तर ठाणे कारागृहात पाठवण्यात यावे असा अर्ज प्रदीप शर्मा यांनी न्यायालयाने केली होती. मात्र न्यायालयाने अर्जाचा विशेष विचार यावा अश्या सूचना तळोजा कारागृह प्रशासनाला दिले आहे. 
एंटालिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकणात एनआयए ने दुसऱ्या खेपेत एन्काउंटर स्पेशालिस्ट माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा, संतोष शेलार, सतीश मोटेकर, मनीष सोनी आणि आनंद जाधव यांना अटक केली होती. सोमवारी या पाचही आरोपीचे एनआयए कोठडी संपल्यामुळे त्यांना विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यात मनीष सोनी आणि सतीश मोटेकर याचा हिरेन हत्या प्रकरणात महत्वाचा सहभाग असून या पैकी सतीश याने हत्येनंतर विदेशी दौरा केला असल्याची माहिती एनआयए ने न्यायालयात दिलेली आहे, तसेच या सर्व प्रकणासाठी विशेष फंड जमा करण्यात आला असल्याचे सांगत एनआयए ने न्यायालयाकडे मनीष सोनी आणि मोटेकर याची एनआयए कोठडी वाढवून मागितली होती. 
 
न्यायालयाने मनीष सोनी आणि सतीश मोटेकर या दोघांच्या एनआयए कोठडीत १ जुलै पर्यत वाढ केली असून प्रदीप शर्मा आणि इतर दोन आरोपी असे तिघांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यादरम्यान प्रदीप शर्मा यांनी न्यायालयाकडे अर्जामार्फत मला विशेष कारागृहात ठेवण्यात यावे अशी विनंती केली आहे. या अर्जाचो योग्य ती दखल घेण्याची सूचना न्यायालयाने तळोजा कारागृह प्रशासनाला दिली आहे. 
तळोजा तुरुंगात या गुन्ह्यातील पहिल्या खेपेत अटक करण्यात आलेले आरोपी सचिन वाजे, माने सह इतर तिघे जण आहेत, सचिन वाजेसह तुरुंगात असलेल्या बडतर्फ पोलिसांचा समोर यायचे नसल्यामुळे शर्मा यांनी वेगळे कारगृहात ठेवण्याची मागणी केली असावी अथवा  तळोजा मध्ये अनेक खतरनाक गुंड, गँगस्टर शिक्षा भोगत आहे. या गँगस्टर , गुंडापासून प्रदीप शर्मा यांना भीती असावी अशी शक्यता काही अधिकारी यांनी वर्तवली आहे. 
First Published on: June 28, 2021 6:21 PM
Exit mobile version