संसदेत निलंबनानंतरही शेतकरी पाठिंब्यासाठी राजीवजींनी वाढदिवसाची रात्र काढली होती, प्रज्ञा सातवांनी केली आठवण शेअर

संसदेत निलंबनानंतरही शेतकरी पाठिंब्यासाठी राजीवजींनी वाढदिवसाची रात्र काढली होती, प्रज्ञा सातवांनी केली आठवण शेअर

संपूर्ण लढा सुरू होता. तसेच शेतकरी सुद्धा लढत होते. तसेच या लढ्याला पाठींबा देण्यासाठी काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांनी यांनी राज्यसभा आणि संसदेमध्ये आवाज उठवला होता. परंतु त्यादिवशी त्यांचं निलंबन झालं होतं. निलंबन झाल्यानंतर त्यांनी रात्रभर संसेदच्या परिसरात आंदोलन केलं होतं. त्यादिवशी त्यांचा वाढदिवस देखील होता. तरीसुद्धा शेतकऱ्यांना पाठींबा देण्यासाठी त्यांनी संपूर्ण रात्र जागून काढली होती आणि आज खऱ्या अर्थाने वर्षभरानंतर या लढ्याला यश मिळाले आहे. तसेच त्यांनी ट्विट करत टूट गया अभिमान जीत गया किसान असं देखील म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे रद्द केल्यानंतर संपूर्ण देशभरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. राजकीय क्षेत्रातून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत आज खऱ्या अर्थाने वर्षभरानंतर या लढ्याला यश मिळाले आहे. अहंकाराचा पराजय आणि सत्याचा आज विजय झाला आहे. त्यामुळे आजचा दिवस ऐतिहासिक आहे. असं प्रज्ञा सातव यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कृषी कायदे रद्द केल्यानंतर शेतकऱ्यांनी त्याचं स्वागत केलं आहे. परंतु शेतकऱ्याच्या एका गटाने त्याला विरोध केला आहे. हे कायदे समजावून सांगण्याचा आम्ही भरपूर प्रयत्न केला तरीदेखील त्यामध्ये आम्ही कमी पडलो नाही. त्यामुळे कबुली देतेवेळी कोणालाही दोष देण्याची गरज नाहीये. असे त्यांचे म्हणणे आहे. या महिन्याच्या अखेरीस संसदेच्या अधिवेशनात हे कायदे मागे घेण्यासाठी त्यावरील आम्ही प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता आंदोलन करू नये, असं आवाहन मोदींनी केलं आहे.


हेही वाचा: निवडणुकीत हरवा, भाजपची जिरवा ; काँग्रेस नेते नितीन राऊत यांचे आवाहन


 

First Published on: November 19, 2021 9:05 PM
Exit mobile version