संभाजीराजे छत्रपतींनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; राज्यात नव्या समिकरणांची शक्यता

संभाजीराजे छत्रपतींनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; राज्यात नव्या समिकरणांची शक्यता

गेल्या काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. राज्याच्या राजकारणात घडणाऱ्या घटनांबाबत आंबेडकरांनी पवारांसोबत चर्चा केल्याचे बोलले जात होते. अशातच आता संभाजीराजे छत्रपती यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे राज्यात नव्या समिकरणांची शक्यता वर्तवली जात आहे. (Prakash Ambedkar met Sambhaji Raje Chhatrapati)

प्रकाश आंबेडकर आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यात झालेल्या भेटीबाबत संभाजीराजेंनी ट्विटर माहिती दिली. ‘पुणे येथे ॲड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. महाराष्ट्रात सुरू असलेले सद्यस्थितीचे राजकारण व राज्यासमोर असलेल्या समस्या, जनतेच्या गरजा – अपेक्षा यांबाबत सविस्तर चर्चा झाली’, असे संभाजीराजेंनी ट्वीटमध्ये लिहिले.

प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार भेट

प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांची दोन दिवसांपूर्वी भेट झाली होती. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसंदर्भात ही भेट होती. वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीमधील प्रवेशाबाबत ही बैठक नव्हती, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले होते.


हेही वाचा – हिंदुत्व नशेच्या व्यापारात अडकले; संजय राऊतांनी भाजप नेत्यांविरुद्ध केली चौकशीची मागणी

First Published on: May 1, 2023 2:48 PM
Exit mobile version