…म्हणून मविआच्या मोर्चात सहभागी झालो नाही; प्रकाश आंबेडकरांचे स्पष्टीकरण

…म्हणून मविआच्या मोर्चात सहभागी झालो नाही; प्रकाश आंबेडकरांचे स्पष्टीकरण

आजचा महामोर्चा हा महाविकास आघाडीचा आहे. महाविकास आघाडीमध्ये आम्हाला घ्यायला मतभेद आहेत. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा आम्हाला महाविकास आघाडीत घेण्यास विरोध आहे, असे वक्तव्य करत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ‘मविआ’च्या महामोर्चात सामील न होण्याचे कारण सांगितले. तसेच, ‘काँग्रेस आणि राष्ट्रवादीला गरिबाला सत्तेत येऊच द्यायचे नाही. हा मोर्चा शिवसेनेचा आहे, नावाला फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादी आहे’, अशा शब्दांत प्रकाश आंबेडकर यांनी कॉँग्रेस राष्ट्रवादीवर टीका केली आहे. (Prakash Ambedkar Talk on MVA Mahamorcha and entry into Mahavikas Aghadi)

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना महाविकास आघाडीच्या महामोर्चामध्ये सामील न होण्यामागचे कारण सांगितले. “हा मोर्चा महाविकास आघाडीचा असून, आम्हाला घ्यायला मतभेद आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा आम्हाला घ्यायला विरोध आहे. त्यामुळे आमच्या जाण्याचा संबंध येत नाही. आम्हाला सोबत घेण्याबाबत उध्दव ठाकरे यांनी निर्णय घ्यावा. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला गरिबाला सत्तेत येऊच द्यायचे नाही. हा मोर्चा शिवसेनेचा असून, नावाला फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादी आहे.”, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

शिवाय, “आम्ही वंचितला महाविकास आघाडीमध्ये घायचा विचार करू, असे उद्धव ठाकरे यांनी केवळ आम्हाला सांगितले होते. मात्र, अजित पवार यांनी हा प्रश्न अजून विचाराधीन असल्याचे सांगितले. त्यामुळे याचा अर्थ नाही असा होतो. असो राष्ट्रवादी हा श्रीमंत मराठ्यांचा पक्ष आहे. त्यांना गरीब मराठा देखील चालत नाही. मी एकनाथ शिंदे यांना भेटायला गेलो नाही. ते राजगृहावर भेटायला आले. एक कुटुंब म्हणून आम्ही स्वागत केले. इंदू मिल संदर्भात विषयांवर चर्चा झाली. एक गलिच्छ राजकारण सध्या सुरू आहे. महापुरुषांनी आदर्श समाजात ठेवला आहे”, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.

“भाजपाचा सामाजिक आणि राजकीय लढ्यात सहभाग नाही. त्यामुळे त्यांच्याकडे सिम्बॉल्स नाही. त्यामुळे जे सिम्बॉल्स आहे, त्याला काळे फासण्याचे काम सुरू आहे. आरएसएस ने खोक्याच्या संस्कृतीतून संस्था उभ्या केल्या’, त्यांनी जर वेळ दिला तर आम्ही जाहीर सत्कार करू. आज भाजपावर मीच जास्त टीका करतो, मी चाळीस वर्षे राजकारणात आहे, पण डाग नाही, सगळे डागळलेले आहे”, अशी टीकाही प्रकाश आंबेडकर यांनी भाजपावर टीका केली आहे.


हेही वाचा – नाकावर टिच्चून सरकार स्थापन केलंय, फडणवीसांचा राऊत आणि पवारांना खोचक टोला

First Published on: December 17, 2022 5:39 PM
Exit mobile version