मी स्वतःच अडचणीत, प्रताप सरनाईक यांची अनिल परब विरोधातील कारवाईवर प्रतिक्रिया

मी स्वतःच अडचणीत, प्रताप सरनाईक यांची अनिल परब विरोधातील कारवाईवर प्रतिक्रिया

मी स्वतःच अडचणीत, प्रताप सरनाईक यांची अनिल परब विरोधातील कारवाईवर प्रतिक्रिया

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात करण्यात आलेल्या कारवाईमध्ये परिवहन मंत्री अनिल परब यांचा हात असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. अनिल परब यांच्याविरोधातील कारवाईवर शिवसेना नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांना प्रश्न विचारण्यात आला असता “मी स्वतःच अडचणीत आहे. त्यांच्यावर काय बोलणार” अशी प्रांजळ कबुली अनिल परब यांनी दिली आहे. अनिल परब यांच्यावर सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपने केली आहे. या मागणीबाबत प्रताप सरनाईक यांना एका कार्यक्रमात प्रश्न करण्यात आला होता.

धर्मवीन आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रताप सरनाईक एका कार्यक्रमात उपस्थित होते. अनिल परब यांच्याविरोधात भाजपकडून कारवाईची मागणी करण्यात येत आहे. याबाबत प्रताप सरनाईक यांना प्रश्न विचारण्यात आला होता. सरनाईक यांनी हसत मी स्वतःच अडचणीत आहे अशी प्रतिक्रिया दिली तसेच अधिक बोलणंही सरनाईक यांनी टाळलं आहे. प्रताप सरनाईक फाउंडेशन माध्यमातून सर्व वैद्यकिय उपकरणांसहित सुसज्ज दोन कार्डियाक अँब्युलन्स, दोन ब्लड डोनेशन व्हॅन,कर्करोगाचे निदान जागेवर तात्काळ होण्याकरीता एक कर्करोग निदान व्हॅन व शितपेटीसह दोन मोक्षरथ अशा सर्व वैद्यकिय सुविधा ठाणेकर नागरिकांना २४ तास मोफत उपलब्ध होणार आहेत.

नगरविकास मंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते दोन कार्डियाक अँब्युलन्स, दोन ब्लड डोनेशन व्हॅन,कर्करोगाचे निदान जागेवर तात्काळ होण्याकरीता एक कर्करोग निदान व्हॅन व शितपेटीसह दोन मोक्षरथ या सर्व सुविधा उपक्रमांचा, वाहनांचा लोकार्पण सोहळा पार पडला.

दही हंडीवर सरनाईकांची प्रतिक्रिया

ठाण्यात आमदार प्रताप सरनाईक दरवर्षी दही हंडीचा उत्सव साजरा करत असतात. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे राज्य सरकारने दही हंडीवर निर्बंध लागू केले आहेत. यावर सरनाईक यांनी म्हटलं आहे की, भाजप आणि मनसेला सणानिमित्त आंदोलन करायचे आहे. त्यांना या निमित्ताने राज्य सरकारचा विरोध करायचा आहे त्यांना लखलाभ असोत. मात्र आम्ही कोरोनाच्या नियमांचे सणादरम्यान पालन करु अशी प्रतिक्रिया आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.


हेही वाचा : भाजपच्या पोकळ धमक्यांना महाविकास आघाडीचे नेते घाबरत नाहीत, नवाब मलिक यांचा इशारा


 

First Published on: August 26, 2021 4:32 PM
Exit mobile version