भाजप नेत्यांवर शासकीय यंत्रणांचा गैरवापर करुन षडयंत्र रचलं जातंय, प्रवीण दरेकरांचा आरोप

भाजप नेत्यांवर शासकीय यंत्रणांचा गैरवापर करुन षडयंत्र रचलं जातंय, प्रवीण दरेकरांचा आरोप

भाजप नेत्यांवर शासकीय यंत्रणांचा गैरवापर करुन षडयंत्र रचलं जातंय, प्रवीण दरेकरांचा आरोप

महाराष्ट्रात भाजप नेत्यांवर शासकीय यंत्रणांद्वारे कारवाई करण्यात येत असून नेत्यांविरोधात षडयंत्र करण्यात येत असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. मुंबै बँक मजूर घोटाळ्यावरुन प्रवीण दरेकरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय यंत्रणांद्वारे कारवाई करण्यात येत आहे. यामुळे राज्य सरकार शासकीय यंत्रणांचा वापर करुन विरोधकांना टार्गेट करुन चौकशी करण्यात येत असल्याचा आरोप दरेकर यांनी केला आहे. नेत्यांच्या ज्या चौकश्या झाल्या त्या भाजपमुळे नाही तर न्यायालय आणि पुराव्यांच्या आधारे करण्यात आल्या आहेत. सरकार विरोधात टीका करणाऱ्या नेत्यांवर महाविकास आघाडी सरकार कारवाई करत असल्याचे प्रवीण दरेकर म्हणाले.

भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये मजूर म्हणून निवडणूक लढवल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरुन दरेकरांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. बँकेच्या माध्यमातून कर्ज देताना पक्षीय वातावरण नसतं. ज्यांना ज्यांना कर्जाची गरज असते ते विहित नमुन्यासह अर्ज करतात. त्यामध्ये नाबाड, आरबीआय किंवा सहकार खातं यांची जी काही मार्गदर्शक तत्वे आहेत यांच्या चवकटीत बसवून संचालक मंडळ निर्णय घेत असतं. माझ्यावर घोटाळ्याचे आरोप होत असले तरी कोणत्याही घोटाळ्यांची चौकशी व्हावी हे भाजपाचे मत आहे. भाजपने चौकशीला कधीच बगल दिली नाही. ज्या काही राज्यात चौकश्या झाल्या आहेत त्या भाजपने केल्या नाही आहेत. कधी न्यायालयाने ऑर्डर दिली, कधी तक्रारी होत आहेत परंतु आमच्या लोकांवर ज्या कारवाया होत आहेत. त्या कारवाया षडयंत्र असल्यासारखे आहेत. ज्याचे पुरावे गिरीश महाजनांच्या प्रकरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. आता मुंबई बँकेच्याबाबतही षडयंत्र आहे. मुख्यमंत्री कार्यालय, गृहमंत्रालय, सरकार , सीपी सहकार मंत्री, पुन्हा तक्रारी असं करुन षडयंत्र रचले आहे.

सहकार कळत नसणारे असे आरोप करतात

ज्याला सहकार कळत नाही तो अशा प्रकारेच आरोप करु शकतो. जिल्हा मध्यवर्ती बँक असेल राज्य सहकारी बँक असेल. कुठलीही सहकारी संस्था असेल तिथे सामुदायिक निर्णय होत असतो. जबाबदारीसुद्धा वाटली गेलेली आहे. त्यामुळे कोणताही निर्णय हा रितसर प्रक्रियेने होत असतो. अर्ज येत असतो त्याची छाननी करत असते आणि यानंतर कार्यालय स्वतःची टिप्पणी करत असते. शिफारस किंवा नाकारात असते यानंतर संचालक मंडळात चर्चा होते आणि सर्वांच्या मताने निर्णय होत असतो. कोणताही संचालकाला वाटत म्हणून निर्णय होत नसतो एकमताने निर्णय होतो.

भाजपमधील सर्व समाधानी

कशा प्रकारे नैराश्य नाराजी दिसली असती. भाजप सामुदायिक निर्णय घेत असते. सगळ्यांना विश्वासात घेत असतात त्यामुळे सर्व समाधानी आहेत. आता विरोधी पक्षनेता म्हणून महाविकास आघाडी सरकारवर टीका टिप्पणी करत असतो त्याचा पोटशूळ आहे. मग त्यांच्याकडून कारवाया करायच्या परंतु अंतर्गत वाद काही लावता येत आहेत. हा फक्त भाजपामध्ये फूट पाडण्याचा केविलवाणा आणि दुर्दैवी प्रयत्न आहे. असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.


हेही वाचा : देवेंद्र फडणवीसांचा एमआयएमद्वारे महाविकास आघाडी तोडण्याचा डाव, शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंचा आरोप

First Published on: March 19, 2022 5:11 PM
Exit mobile version