मुंबई, महाराष्ट्रातील खरी वस्तुस्थिती मांडण्यासाठी फडणवीसांचे सोनिया गांधींना पत्र – प्रवीण दरेकर

मुंबई, महाराष्ट्रातील खरी वस्तुस्थिती मांडण्यासाठी फडणवीसांचे सोनिया गांधींना पत्र – प्रवीण दरेकर

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर

कोरोनामुळे देशात सर्वाधिक मृत्यू मुंबईसह महाराष्ट्रात होत आहेत. तरी देखील मुंबई आणि महाराष्ट्र मॉडेलचं कौतुक करण्यात सत्ताधारी महाविकास आघाडी व्यस्त आहेत. म्हणून खरी वस्तुस्थिती मांडणं आवश्यक असल्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. देशात सर्वाधिक कोरोना मृत्यूंची संख्या महाराष्ट्रात आहे. महाविकास आघाडी सरकारने कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे आकडे लपवले आहेत. त्यामुळे राज्यातील वस्तुस्थिती सोनिया गांधी यांना कळाली पाहिजे यासाठी फडणवीसांनी पत्र लिहिले असल्याचे दरेकरांनी म्हटले आहे.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ट्विट करत फडणवीस यांच्या पत्रावर प्रतिक्रिया देत आहेत. ज्या पद्धतीने महाराष्ट्र मॉडेलचे ढोल पिटवले जात आहेत. प्रत्यक्षात देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईचा दोन वर्षांच्या मृत्यूचा अहवाल दिला आहे. यामध्ये २० हजार मृत्यू वाढलेत आणि १० हजार आकड्याचे मृत्यू दाखवले गेलेच नाहीत. जर देशात सर्वाधिक मृत्यू मुंबई महाराष्ट्रात होत असतील आणि पुन्हा मुंबई महाराष्ट्राच्या मॉडेलचे कौतुक राजकारण जर करत असतील तर कुठेतरी वस्तुस्थिती मांडणे आवश्यक आहे.

घटक पक्षाच्या सर्वोच्च नेत्या काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी ज्यांच्यासहकार्याने महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आहे. किंबहुना देशात पक्षाचे नेतृत्व करत आहेत मोदींना विरोध करत आहेत. त्यांना वस्तुस्थितीची जाणीव करुन देण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्राच्या माध्यमातून पुर्णपणे कोरोनाचा वाढता आलेख मृत्यूदर आणि वस्तु कशा लपवल्या जात आहेत याबाबत सर्व लेखाजोखा पाठवला आहे. यापद्धतीने सोनिया गांधी यांना पत्र पाठवून वस्तुस्थिती मांडली आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या पत्रात काय म्हटलंय

देशात दररोज ४००० मृत्यू कोरोनामुळे नोंदले जात असताना त्यातील ८५० हे महाराष्ट्रातील आहेत आणि सरकार आपले कौतूक करण्यात व्यस्त आहे. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र यासारख्या भागांकडे सरकारचे पूर्ण दुर्लक्ष आहे. त्यांना देवाच्या आधारावर सोडून देण्यात आले आहे. ग्रामीण भागात बेडस नाही, उपचार नाही, रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनसाठी संघर्ष आहे. शेवटी विविध न्यायालयांना हस्तक्षेप करीत आदेश द्यावे लागले आहेत. ग्रामीण महाराष्ट्रात कोरोना संसर्ग आणि मृत्यूची स्थिती अतिशय वाईट आहे.

First Published on: May 15, 2021 8:23 PM
Exit mobile version