मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा दिखाऊपणाचा, केवळ तोंडाला पानं पुसण्याचे काम केल्याचे दरेकरांचा आरोप

मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा दिखाऊपणाचा, केवळ तोंडाला पानं पुसण्याचे काम केल्याचे दरेकरांचा आरोप

मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा दिखाऊपणाचा, केवळ तोंडाला पानं पुसण्याचे काम केल्याचे दरेकरांचा आरोप

तौत्के चक्रीवादळामुळे कोकणवासीयांचे मोठे नुकसान झाले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी कोकण दौरा केला यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. मुख्यमंत्र्यांचा दौरा हा कोकणवासीयांच्या डोळ्यात धूळफेक करणारा आणि दिखाऊपणाचा दौरा होता. कोकणवासीयांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम ह्या सरकारने केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी ३ तासाचा दौरा करण्यापेक्षा जिल्हाधिकारी, पालकमंत्र्यांना मंत्रालय, वर्षा नाहीतर मातोश्रीवर बोलावून बैठक करुन नुकसानग्रस्तांना मदत करावी असा टोला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे.

कोकणातील नुकसानग्रस्तांना पालकमंत्री उदय सामंत, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, एकनाथ शिंदे यांनी तात्काळ पंचनामे करुन मदत करण्यात येईल असे सांगण्यात आले होते. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकण दौरा केला तेव्हा त्यांनी सांगितले की, २ दिवसांनी पंचनामे करुन मदत करु असे म्हटले. कोकणवासीयांना आशा होती की मुख्यमंत्री आले तर काहीतरी मदत देऊन जातील. आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, काही अंशी पंचनामे करुन पुर्ण झाले आहेत. मदत ही पंचनाम्याच्या अंदाजे करायची असते परंतु अजूनही मदत केली नाही.

मविआला वसुलीच्या व्हाईट फंगसचा रोग

संजय राऊत म्हणतात विरोधक ‘ब्लॅक फंगस’ आहेत! पण, त्यांना हे ठाऊक नाही की हे अख्ख सरकारच जनतेच्या मानगुटीवर बसलेला कोरोना असून पक्ष तीन असले तरी यात कितीतरी विविध प्रकारचे ‘म्युटंट’ आहेत. महाविकास आघाडी सरकारला केवळ भ्रष्टाचाराचा ‘ब्लॅक फंगस’ चिकटलेला नाही, तर राजरोस पोलिसी वसुलीच्या ‘व्हाईट फंगस’चाही रोग जडलेला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ञ डॉक्टरांच्या ‘कंपाऊंडर’ला एवढेही ठाऊक नसावे ? आश्चर्य आहे! असे ट्विट करत दरेकरांनी संजय राऊतांचा समाचार घेतला आहे.

First Published on: May 23, 2021 11:20 PM
Exit mobile version