पर्यावरणमंत्र्यांच्या मतदारसंघात रात्रीच्या अंधारात झाडांची कत्तल, दरेकरांचा आरोप

पर्यावरणमंत्र्यांच्या मतदारसंघात रात्रीच्या अंधारात झाडांची कत्तल, दरेकरांचा आरोप

पर्यावरणमंत्र्यांच्या मतदारसंघात रात्रीच्या अंधारात झाडांची कत्तल, दरेकरांचा आरोप

भाजप नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी वरळीत रात्रीच्या अंधारात झालेल्या वृक्षतोडीवरुन मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. प्रवीण दरेकर यांनी वरळीत झालेल्या वृक्षतोडीची पाहणी केली आहे. जागतिक पर्यावरण दिनाची पानभर जाहिरात देणाऱ्या पर्यावरणमंत्र्यांच्या मतदारसंघात, तो पेपर शिळा होण्याअगोदरच रात्रीच्या अंधारात झाडांची अमानुष कत्तल? कशासाठी? असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला आहे. पर्यावरणमंत्र्यांच्या मतदारसंघातचं झाडांची कत्तल झाली. कुंपणाने शेत खाण्याचा प्रकार आहे यावर कडक कारवाई करावी झाली पाहिजे अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

महापालिकेच्या वृक्षप्राधिकरणावर आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. झाडाच्या फांद्या अडव्या आल्यावर नागरिक तक्रार करतात तेव्हा पालिकेकडे २-२ महिने वेळ नसतो, वृक्ष तुटतात त्यामुळे माणसांचे जीव जातात अशा वेळी परंतु कोणीही येतो आणि खुलेआम झाडांची कत्तल करतो याचा अर्थ महापालिकेचा कायदा नावाची भीती राहिली नाही आहे. कोणालाही पाठीशी न घालता कारवाई करावी अशी मागणी असल्याचे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. हा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. त्यांच्याच मतदारसंघात असे झाल्यास नागरिकांनी कोणाकडे जावं असा सवाल दरेकरांनी केला आहे.

मुंबई भाजप अध्यक्ष आमदार मंगल प्रभात लोढा यांच्यासमवेत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी वरळीमधील वृक्षतोडीची पाहणी केली यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावात ऑक्सिजनची कमतरता भासत असताना ७ ते ८ वर्षांची झाडे तोडण्यात येत आहेत. याचा जाब विचारला जाईल असे दरेकरांनी म्हटले आहे.

मुंबई पेडणेकरांना दरेकरांचा सवाल

मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांना म्हटले आहे की, निवडणुकीच्या आधी विरोधकांनी दुर्बीण लावून शोधलेली ही घटना नाहीये, दक्ष माध्यमांनी आणि सामान्य मुंबईकरांनी लक्षात आणून दिलेली घटना आहे. कृपया, त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याऐवजी मुंबई महानगरपालिकेचे काम सुधारलं पाहिजे. काम कसं करायचं हे समजलं असतं तर एका दिवसाच्या पावसाने मुंबईची तुंबई झाली नसती किंवा २५ वर्षात झोपडपट्ट्या शौचालयाविना राहिल्या नसत्या. छोटी झुडपं छाटून टाकली आहेत, हे किशोरी पेडणेकर यांचे वक्तव्य अत्यंत आक्षेपार्ह आणि घटनेचं गांभीर्य कमी करणारं आहे. छोट्या झुडपांचच रूपांतर मोठ्या वृक्षात होत असतं, मोठी झाडं काही आभाळातून पडत नाहीत. ही झुडपं नव्हती ५-७ वर्षांची झाडं होती असा निशाणा प्रवीण दरेकर यांनी साधला आहे.

First Published on: June 6, 2021 8:30 PM
Exit mobile version