‘तुमचं अर्धे मंत्रिमंडळ उपऱ्यांचे असताना भाजपवर टीका करणं किती संयुक्तिक’?, दरेकरांचा राऊतांवर पलटवार

‘तुमचं अर्धे मंत्रिमंडळ उपऱ्यांचे असताना भाजपवर टीका करणं किती संयुक्तिक’?, दरेकरांचा राऊतांवर पलटवार

शिवसेनेचे अर्धे मंत्रिमंडळ उपऱ्यांचे असताना भाजपमध्ये किती उपऱ्यांची भर्ती केली असा आरोप करणं किती संयुक्तिक आहे. असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपमध्ये व्यापारी आणि उपऱ्यांची भर्ती केली असल्याची टीका केली आहे. राष्ट्रवादी, काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर शिवसेनेचे नेते, मंत्री, कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी काय म्हटलंय यापेक्षा शिवसेनेतील नेत्यांचे मत जाणून घेतलं तर अधिक फायदा शिवसेनेला होईल असे वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी केलं आहे.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना खासदार संजय राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपवर टीका करण्यापेक्षा शिवसेनेत काय चाललंय याबाबत माहिती घेतली तर शिवसेनेसाठी फायदेशीर ठरेल असे दरेकरांनी म्हटलं आहे. भाजपवाले उपरे उमेदवार घेतात आणि एक नंबरचा पक्ष असल्याचा दावा करत आहेत असे शिवसेनेकडून म्हटल आहे. राऊतांनी महाराष्ट्रात महिलांवर होणारे अत्याचार, हत्या, बलात्कार, या विषयी जर राज्य सरकारला सल्ला देऊन काय कारवाई झाली तर आम्ही अभिनंदन करु असेही दरेकर यांनी म्हटलं आहे.

प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे की, संजय राऊतांनी वक्तव्य उपरे आणि व्यापारी यांची भरती भाजपमध्ये किती झाली. आपण आपल्या पक्षातील उपऱ्यांची संख्या आणि भाजपच्या उपऱ्यांची संख्या यांची आकडेवारी समोर येऊद्या. आजची शिवसेना पूर्ण उपऱ्यांचे वर्चस्व असणारी मंत्रिमंडळात कोण आहेत? उदय सामंत ६६चे शिवसैनिक आहेत का? आजचे प्रमुख प्रवक्ते ढाल असणारे अब्दुल सत्तार ६६ चे शिवसैनिक आहेत का? शंकरराव गडाख कधीचे शिवसैनिक आहेत त्यांना कॅबिनेट मंत्री केलं. प्रियंका चतुर्वेदी कोण आहेत त्या खासदार आहेत. ऊर्मिला मातोंडकर कोण आहेत त्याच्यामुळे अर्धे मंत्रिमंडळ उपऱ्यांचे असताना भाजपमध्ये उपऱ्यांना घेता असा आरोप करणं किती संयुक्तिक आहे असे सवाल विधानपरषदेचे विरोधी पक्षनेत प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

माझी विनंती आहे की काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेल्यावर शिवसेनेच्या नेत्यांमध्ये जी अस्वस्थता आहे त्यांचे मत जाणून घेतलं तर शिवसेनेसाठी हिताचे राहिल. अनंत गीतेंनी काय भूमिका मांडली त्यांच्याकडे पाहण्यासाठी वेळ नाही. परंतु पंकजा मुंडे यांनी काय भूमिका मांडली हे उपरे अवसान घेऊन राऊत बोलत आहेत. रामदास कदम, प्रताप सरनाईक, हेमंत पाटील यांनी घेतलेल्या भूमिकांसह शिवसैनिकांच्या मनात काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी सत्तेमुळे वेळ नाही. हे पाहिले तर निश्चितपणे पक्षाच्या हिताचे होईल.


हेही वाचा : भाजप नेते कोणत्या नशेत बोलतात हे तपासावं लागेल; शिवसेनेचा खोचक टोला


 

First Published on: October 18, 2021 2:58 PM
Exit mobile version