राष्ट्रपतींची दुर्गराज रायगडला भेट : ही सदिच्छाभेट माझ्यासाठी एखाद्या तीर्थयात्रेसारखी – राष्ट्रपती रामनाथ कोविंद

राष्ट्रपतींची दुर्गराज रायगडला भेट : ही सदिच्छाभेट माझ्यासाठी एखाद्या तीर्थयात्रेसारखी – राष्ट्रपती रामनाथ कोविंद

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज(सोमवार) दुर्गराज रायगडला भेट दिली आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटीचं निमंत्रण दिलं होतं. तब्बल ३५ वर्षांनी भारताच्या राष्ट्रपतींनी किल्ले रायगडला भेट दिली आहे. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज, राज्यसभा संसद श्री संभाजी छत्रपती यांना या यात्रेसाठी मी धन्यवाद करतो. ही सदिच्छाभेट माझ्यासाठी एखाद्या तीर्थयात्रेसारखी. असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या भाषणातून संबोधन केलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचा हा परिसर सर्वांसाठी हदयामध्ये एक तीर्थ-स्थळाचं स्थान दर्शवतं. ही वीर माता जीजाबाई यांची पुण्य-भूमी आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी मला संधी मिळाली. त्यामुळे मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी भेटीचं निमंत्रण दिलं होतं. तब्बल ३५ वर्षांनी भारताच्या राष्ट्रपतींनी किल्ले रायगडला भेट दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज, राज्यसभा संसद श्री संभाजी छत्रपती यांना या यात्रेसाठी मी धन्यवाद करतो. ही सदिच्छाभेट माझ्यासाठी एखाद्या तीर्थयात्रेसारखी आहे. असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे.

छत्रपती शिवाजी महराजांच्या समाधीच्या जिर्णोद्धरामध्ये बाळ गंगाधर टीळक यांनी भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. आधुनिक इतिहासात विद्यार्थ्यांना माहिती आहे की, लोकमान्य टीळक यांनी गणपती आणि शिवजन्मोत्सव उत्सवाचं आयोजन केलं. गणपती उत्सव आणि शिवजन्मोस्तावामुळे देशातील प्रेम आणि भावना वाढू लागल्या. महाराष्ट्र आपल्या स्वाधीनताच्या संघर्षासाठी एक प्रमुख केंद्र बनलं आहे.

शिवाजी महाराजांच्या समर्थ नेतृत्वाखाली, या संपूर्ण प्रदेशाच्या वैभवात वाढ झाली आणि देशभक्तीची भावना पुन्हा निर्माण झाली, असे ते म्हणाले. १९ व्या शतकातील ‘शिवराज-विजय या संस्कृत ग्रंथामध्ये शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे अत्यंत प्रभावी वर्णन केले आहे याचा त्यांनी उल्लेख केला. देशातील जनतेला, विशेषतः युवा वर्गाला महाराजांच्या महान व्यक्तिमत्त्वाशी परिचित होता यावे आणि महाराजांचे वैशिष्ट्यपूर्ण कार्य समजून घेता यावे यासाठी या ग्रंथाचे विविध भारतीय भाषांमध्ये भाषांतर केले जावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

छत्रपती शिवाजी महाराजांची विचारसरणी भविष्यकाळाचा वेध घेणारी होती. महाराजांनी त्यांच्या ‘अष्टप्रधान’ नामक मंत्रिमंडळाच्या मदतीने दूरदर्शी परिणाम साधणारे अनेक निर्णय घेतले असे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतातील पहिल्या आधुनिक नौदलाची उभारणी केली याचा उल्लेख राष्ट्रपतींनी केला. ४ डिसेंबरला आम्ही नौदल दिवस साजरा केला आहे आणि आगामी ८ डिसेंबर रोजी मला नौदलाच्या एका कार्यक्रमात सहभागी व्हायचं आहे. नौदलात काम करणारे नौ-सैनिक आणि अधिकारी सुद्दा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेतात. मला विश्वास आहे की, रायगडच्या या ऐतिहासिक दुर्गमधून प्राकृतिक सौंदर्यासोबतच आधुनिक विकासाचे दृश्य सुद्दा पहायला मिळतील. असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले.


हेही वाचा: वरळी गॅस सिलेंडर स्फोट दुर्घटना ; ‘ त्या’ लहान मुलाच्या आईचाही मृत्यू


 

First Published on: December 6, 2021 9:08 PM
Exit mobile version