एमपीएससीकडून संभाव्य तारखा जाहीर; वर्णनात्मक पद्धतीने होणार परीक्षा

एमपीएससीकडून संभाव्य तारखा जाहीर; वर्णनात्मक पद्धतीने होणार परीक्षा

मुंबई – एमपीएससीच्या विविध पदभरती परीक्षांचे वेळापत्रक बुधवारी जाहीर करण्यात आले आहे. यानुसार, या वेळापत्रकात दिवाणी कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा २०२३, महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क संयुक्त परीक्षा २०२३ अंतर्गत सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, सहायक मोटार वाहन निरीक्षक, आदी पदांचा समावेश आहे; तर महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित २०२३ अंतर्गत राज्यसेवेत ३३ संवर्गातील पदांमध्ये वनसेवा, अभियांत्रिकी सेवा, कृषी सहायक, आदी पदांचा समावेश आहे.

२०२३ पासून भरती प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात येणार आहेत. यानुसार, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (एमसीक्यू) परीक्षा पद्धत बंद करून वर्णनात्मक पद्धतीने परीक्षा होणार आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षार्थींना तयारीसाठी वेळ मिळण्याच्या दृष्टीने दरवर्षीपेक्षा तीन महिने आधीच संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले. मात्र, असे असले तरीही ही नवी पद्धत २०२५ पासून सुरू करण्याची मागणी परीक्षार्थींकडून करण्यात येतेय.

राज्यसेवा मुख्य परीक्षा चार दिवस होणार आहे. ३० सप्टेंबर, १ ऑक्टोबर, ७ ऑक्टोबर, ८ ऑक्टोबर आणि ९ ऑक्टोबर २०२३  या चार दिवशी परीक्षांचे संभाव्य नियोजन करण्यात आले आहे. तसेच निकाल जानेवारी २०२४ पर्यंत लागण्याची शक्यता आहे. याशिवाय अराजपत्रित गट ब, गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २०२३ च्या अंतर्गत १० पदांसाठी जानेवारी २०२३ मध्ये जाहिरात निघणार असून, ३० एप्रिल रोजी परीक्षा होण्याची शक्यता आहे.

First Published on: September 29, 2022 10:10 AM
Exit mobile version