वर्ध्यातील कंपनीत रेमडेसिवीरच्या निर्मितीस सुरुवात, सर्वसामान्यांना सरकारी दराने मिळणार इंजेक्शन

वर्ध्यातील कंपनीत रेमडेसिवीरच्या निर्मितीस सुरुवात, सर्वसामान्यांना सरकारी दराने मिळणार इंजेक्शन

राज्यात दिवसेंदिवस नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे रेमडेसिवीर इंजेक्शनचा राज्यात तुटवडा निर्माण झाला आहे. राज्य सरकारला केंद्राकडून मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा होत आहे. परंतु आता वर्धा जिल्ह्यात रेमेडसिवीर इंजेक्शनच्या उत्पादनाला सुरुवात झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. वर्धामधील जेनेटिक लाईफ सायन्स कंपनीमध्ये आजपासून रेमडेसिवीर इंजेक्शन निर्मिती करण्यात सुरुवात केली आहे. गडकरींना या कंपनीला गुरुवारी भेट दिल आहे या कंपनीला परवानाही गडकरी यांनीच मिळवून दिला आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी रेमडेसिवीर उत्पादन करणाऱ्या जेनेटिक लाईफ सायन्स कंपनीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी कंपनीत तयार होणाऱ्या रेमडेसिवीरबाबत माहिती घेतली. तसेच या उत्पादन करण्यापुर्वी गडकरींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी गडकरींनी म्हटले आहे की, राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनची निर्मिती होत असल्यामुळे याचा काळाबाजार थांबेल. सामान्य नागरिकांना सरकारी दराने रेमडेसिवीरचे इंजेक्शन उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही गडकरींनी सांगितले आहे.

हैदराबाद मधील हेट्रा कंपनीकडून वर्ध्यातील जेनेटिक कंपनीला रेमडेसिवीर निर्मिती करण्याची परवानगी मिळाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अथक प्रयत्नांमुळे या कंपनीला परवाना मिळाला आहे. राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा असल्यामुळे दिवसाला ३० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन बनवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. नितीन गडकरींनी जेनेटिक लाईफ सायन्स कंपनीत रेमडेसिवीर इंजेक्शनच्या निर्मितीचे उद्घाटन केले त्यावेळी जनेटिक कंपनीचे संचालक डॉ. महेंद्र क्षीरसागर उपस्थित होते. रेमडेसिवीर इंजेक्शन तयार होताना पाहून आपल्याला प्रचंड आनंद झाला असेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

First Published on: May 6, 2021 8:50 PM
Exit mobile version