मराठा आरक्षणास संरक्षण द्या, आदित्य ठाकरेंच्या बंगल्याबाहेर संभाजी ब्रिगेडची घोषणाबाजी

मराठा आरक्षणास संरक्षण द्या, आदित्य ठाकरेंच्या बंगल्याबाहेर संभाजी ब्रिगेडची घोषणाबाजी

मराठा आरक्षणावरुन मराठा समाजाने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. संभाजी ब्रिगेडने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे भेटीची वेळ मागितली होती. आदित्य ठाकरे यांनी भेटीची वेळ न दिल्यानं संतप्त संभाजी ब्रिगेडच्या कार्यकरत्यांनी थेट आदित्य ठाकरेंच्या शासकीय बंगल्याच्या दिशेनं मोर्चा वळवला आणि बंगल्यासमोर ठिय्या आंदोलन केलं आहे. यावेळी काही कार्यकर्त्यांनी बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न केला परंतु आदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मराठा समाज तसेच ओबीसी आरक्षणाला संरक्षण द्या अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी भेटीची वेळ मागितली होती. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी भेट मागितील होती. परंतु आदित्य ठाकरे यांनी भेट दिली नाही. यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी मंत्रालयालगत असलेल्या आदित्य ठाकरे यांच्या शासकिय निवासस्थानाबाहेर जोरदार आंदोलन केलं आहे. कार्यकर्त्यांनी बंगल्याबाहेर ठिय्या आंदोलन करत मोठ्याने घोषणाबाजी केली. यावेळी मरिन ड्राईव्ह पोलिसांनी आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे.

संभाजी ब्रिगेडच्या काही मागण्या आहेत. त्या म्हणजे ओबीसी आरक्षण, मराठा समाजाला संरक्षण द्यावे. सुप्रीम कोर्टाच्या निकालापुर्वीच या मराठा समाजातील नोकरीस पात्र उमेदवारांचा रखडवलेल्या नियुक्त्या तात्काळ द्यावात. मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क तात्काळ माफ करावे. सर्व समाज घटकांची जातनिहाय जनगणना करावी. मराठा समजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्यात यावे अशा मागण्या संभाजी ब्रिगेडतर्फे करण्यात आल्या आहेत.

First Published on: June 30, 2021 4:17 PM
Exit mobile version