पुण्याच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांना कोरोनाची लागण!

पुण्याच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांना कोरोनाची लागण!

मुक्ता टिळक

पुण्याच्या माजी महापौर, भाजपाच्या आमदार मुक्ता टिळक यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुक्ता टिळक व त्यांच्या आई या दोघींचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मुक्ता टिळक यांनी स्वत: ट्विटकरून कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली.

मुक्ता टिळक यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, आमच्या दोघींमध्ये कोरोनाची कुठलीही लक्षणे दिसत नव्हती. आम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सेल्फ आयसोलेशनमध्ये आहोत. घरीच होम क्वारंटाइनमध्ये आहोत. कुटुंबीयातील अन्य सदस्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.

मुक्ता टिळक पुण्याच्या माजी महापौर आहेत. मागच्यावर्षी त्या कसबा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या.

मुंबईपाठोपाठ पुण्यात देखील कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. पुणे जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात १ हजार २४५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहते. पुण्यात सातत्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २९ हजार ८४४ कोरोना रुग्ण आढळले आहेत.


हे ही वाचा – ‘फेरीवाल्यांना परवानगी देण्याचा सरकारचा विचारच नाही’


 

First Published on: July 7, 2020 7:24 PM
Exit mobile version