PUNE : पुण्यात वीजपुरवठा खंडित झाल्यानं नागरिकांचे बेहाल; नितीन राऊत म्हणतात…

PUNE : पुण्यात वीजपुरवठा खंडित झाल्यानं नागरिकांचे बेहाल; नितीन राऊत म्हणतात…

Power Crisis : वीज कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यावर लोडशेडिंगचे संकट? ऊर्जामंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण

पुण्यातील अनेक भागांत आज 9 फेब्रुवारीला पहाटेपासूनच वीज पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे स्थानिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. महापारेषणच्या पुणे परिसरातील लोणीकंद व चाकण या दोन्ही महत्वाच्या 400 केव्ही अतिउच्च दाबाच्या उपकेंद्रांना वीज पुरवठा करणाऱ्या टॉवर लाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. पुण्यात 5 ठिकाणी आज पहाटे 4 : 30 च्या सुमारास बिघाड झाला. त्यावर महापारेषणकडून युद्ध पातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे.

पुणे शहर, पिंपरी चिंचवडमधील अनेक भागांतील वीज अचानक गेल्यामुळे नागरिकांचे बेहाल झाले आहेत. तांत्रिक बिघाडामुळे हा वीज पुरवठा खंडित झाला असल्याची माहिती वीज वितरण कंपनीकडून देण्यात आली. पुण्यातील हडपसर, स्वारगेट, विश्रांतवाडी, बाणेर,शिवाजीनगर, कोथरुड आणि कर्वेनगर या भागातीस वीडपुरवठा खंडित झाला आहे.

वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे याचा पाणी पुरवठ्यावरही परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. मोठ्या प्रमाणातील दाट धुके आणि थंड वातावरणामुळए हा तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या संदर्भातील माहिती महाविकरण कंपनीकडून नोंदणीकृत ग्राहकांना एका मॅसेजव्दारे देण्यात आली.

सकाळी ११ वाजेपर्यंत वीज पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता

“महापारेषणचे सर्व वरिष्ठ अभियंता सध्या टॉवर लाइनमधील बिघाड शोधण्यासाठी युद्धपातळीवर पेट्रोलिंग करीत आहेत. सकाळी ११ वाजेपर्यंत वीज पुरवठा सुरळीत होऊ शकेल. या कालावधीत वीज ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन महापारेषण व महावितरणकडून करण्यात आले आहे”,असे नितीन राऊत यांनी सागितले आहे.


हे ही वाचा – Karnataka Hijab Row : ‘अल्ला हु अकबर’चा नारा देणाऱ्या ‘त्या’ विद्यार्थिनीला जमियत संघटनेकडून ५ लाखांचे बक्षीस


 

First Published on: February 9, 2022 12:03 PM
Exit mobile version