कॉलेजमध्ये २ आठवडे क्वारंटाइन व्हा आणि परीक्षा द्या; पुण्यातील कॉलेजची विद्यार्थांना सूचना

कॉलेजमध्ये २ आठवडे क्वारंटाइन व्हा आणि परीक्षा द्या; पुण्यातील कॉलेजची विद्यार्थांना सूचना

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना, पुणे शहराजवळील एका खासगी डेंटल कॉलेजने १५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच दोन आठवड्यांसाठी क्वारंटाइन व्हायला सांगितलं आहे. त्यानंतर पुढच्या महिन्यात परीक्षा देण्यासाठी उपस्थित रहाण्याच्या सूचना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांचा जिल्हा सोडण्यापूर्वी कोरोना चाचणी करावी, त्यानंतर कमीतकमी दोन आठवडे कॉलेजमध्ये क्वारंटाइन राहण्याच्या सूचना पिंपरी उपनगरातील डी. वाय. पाटील डेंटल कॉलेज व हॉस्पिटलमधील पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत.

विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी कोविड-१९ ची परिस्थिती पाहता परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. तथापि, तपासणी, सामाजिक अंतर आणि स्वच्छतेशी संबंधित सर्व नियम परीक्षेच्या वेळी पाळले जातील, असं महाविद्यालयीन अधिकाऱ्यांनी सांगितलं. ते म्हणाले की परीक्षा वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यांत घेण्यात येणार होती परंतु कोरोना संसर्गाच्या वाढीमुळे ती पुढे ढकलण्यात आली.

नाव न सांगण्याच्या अटीवर एका विद्यार्थ्याच्या नातेवाईकाने सांगितलं की, व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांना सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात महाविद्यालय गाठायला आणि दोन आठवडे क्वारंटाइन व्हायला सांगितलं आहे. यानंतर, तिसर्‍या आठवड्यात परीक्षेला बसा. ते म्हणाले, “पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील परिस्थितीबद्दल सर्वांना माहिती आहे. याशिवाय महाविद्यालयाच्या आवारात कोविड-१९ क्वारंटाइन सेंटर देखील आहे. हे सर्व असूनही, महाविद्यालय विद्यार्थ्यांना हजर राहून परीक्षा देण्यास सांगत आहे.”

कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थ्यांना शहर सोडण्यापूर्वी कोरोनाची चाचणी करण्यास सांगितलं आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी आश्वासन दिलं आहे की बीडीएस व एमडीएसच्या १५० हून अधिक विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यासाठी महाविद्यालयाने सर्व खबरदारीची पावले उचलली आहेत. ते म्हणाले, “मी विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना आश्वासन देऊ इच्छित आहे की परीक्षेच्या काळात महाविद्यालयात तपासणी, सामाजिक अंतर आणि स्वच्छतेशी संबंधित सर्व आवश्यक पावले उचलली जातील.”

“आमच्याकडे वैद्यकीय पाठ्यक्रमाची परीक्षा झाली झाली असून त्यांचे निकाल जाहीर झाले आहेत. परीक्षा उत्तीर्ण झालेले सर्व विद्यार्थी या वेळी संकटात काम करीत आहेत. ते म्हणाले की वसतिगृहे क्वारंटाइनसाठी उपलब्ध आहेत. २५० लोक बसण्याची जागा असल्यामुळे १५९ विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास अडचण येऊ नये,” असं कुलगुरू म्हणाले.


हेही वाचा – रामानंतर आता गौतम बुद्धांवरही नेपाळचा दावा


 

First Published on: August 10, 2020 11:05 AM
Exit mobile version