Mumbai Pune Expressway: होळी सेलिब्रेशनसाठी विकेंडला लोणावळ्याला जाताय ? वाहतूक कोंडी फोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

Mumbai Pune Expressway: होळी सेलिब्रेशनसाठी विकेंडला लोणावळ्याला जाताय ? वाहतूक कोंडी फोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे महाराष्ट्रात अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. होळी आणि धुळवडवर राज्य सरकारचे कुठलेही निर्बंध नाहीयेत. त्यामुळे होळी सेलिब्रेशनसाठी अनेक जण विकेंडच्या निमित्ताने लोणावळ्याला धाव घेत आहेत. परंतु लोणावळा शहरामध्ये पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. अशा वेळी अवजड वाहने लोणावळा शहरातून जातात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन अपघातांचे प्रमाणही वाढत आहेत. त्यामुळे मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

लोणावळा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन अपघातांचे प्रमाणही वाढत आहेत. त्यासाठी स्थानिक नागरिकांनी आंदोलने, रस्ता रोको करून रस्ते विकास महामंडळ आणि आय.आय.बी. यांना निवेदने देऊन उपाय योजना करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार वरसोली आणि दृतगती महामार्गावरून लोणावळा एक्झीट मार्गासह मुंबईकडून खंडाळा मार्गाच्या दिशेने जात असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते. तसेच अनेक अपघात देखील होतात. त्यामुळे वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी काही नवे आदेश जारी केले आहेत.

लोणावळा शहराच्या कार्यक्षेत्रातील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत. वाहतूक कोंडी कमी होऊन अपघात टाळण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी मोठा निर्णय घेतला आहे.


हेही वाचा : चार राज्यांतील विजयानंतर २०२४ च्या निवडणुकीवर पंतप्रधानांचं लक्ष, भाजपच्या हायकमांडसह प्रमुख नेत्यांसोबत बैठक


 

First Published on: March 17, 2022 4:59 PM
Exit mobile version