पुणे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे कोरोनाने निधन

पुणे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे कोरोनाने निधन

पुणे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचा शनिवारी पहाटे कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. चार दिवसांपूर्वी त्यांना ताप आणि खोकला सुरू झाला होता, त्यामुळे त्यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना आज पहाटे त्यांनी पुण्यातील ससून रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्च्यात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. राजेंद्र सरग यांच्या पत्नीला देखील करोनाची लागण झाली असून त्यांच्यावर सध्या ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एक कार्यक्षम, मनमिळावू अधिकारी व पत्रकारांचे मित्र असलेल्या सरग यांच्या अकाली निधनाने प्रशासकीय व माध्यम क्षेत्रात दुखः व्यक्त करण्यात येत आहे.

राजेंद्र सरग यांनी जिल्हा माहिती अधिकारी म्हणून बीड, नगर, परभणी, पुणे अशा अनेक ठिकाणी काम केले आहे. राजेंद्र सरग यांना विविध विषयांवर व्यंगचित्र काढण्याचा छंद होता. येत्या आठवड्यात त्यांचे प्रमोशन होणार असल्याचे त्यांना मुंबई मंत्रालयातून सांगण्यात आले होते.

राजेंद्र सरग यांच्याबद्दल…

राजेंद्र सरग यांनी पुण्याबरोबरच बीड, अहमदनगर, परभणी अशा अनेक ठिकाणी जिल्हा माहिती अधिकारी म्हणून काम केले होते. व्यंगचित्र रेखाटन हा त्यांचा छंद होता. राज्यातील विविध दैनिके, साप्ताहिके व दिवाळी अंकांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून ते मोफत व्यंगचित्र करून देत असत. मदतीला धावून जाण्याच्या स्वभावामुळे त्यांचा मित्रपरिवार मोठा होता.

First Published on: April 3, 2021 10:44 AM
Exit mobile version