बारामतीप्रमाणे पुण्यातही रुग्णसंख्या वाढणाऱ्या ठिकाणी लॉकडाऊन गरजेचा, प्रशासनाला सूचना – अजित पवार

बारामतीप्रमाणे पुण्यातही रुग्णसंख्या वाढणाऱ्या ठिकाणी लॉकडाऊन गरजेचा, प्रशासनाला सूचना – अजित पवार

पुण्यामध्ये कोरोनाची साखळी तोडण्यासाठी येत्या दिवसांमध्ये निर्बंध आणखी कडक करण्याच्या सूचना पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. पुण्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये पार पडलेल्या आढावा बैठकीत त्यांनी या सूचना प्रशासनाला केल्या आहेत. या बैठकीत पुण्यात आता ज्यापद्धतीने नियम सुरु ठेवावेत, हवं तर आणखी कडक निर्बंध करावेत, जे अनावश्यकपणे बाहेर फिरणाऱ्यांना रोखावे अशी चर्चा या बैठकीत झाली असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे. या बैठकीत लस, ऑक्सिजन, रेमडेसिवीरचा पुरवठा, ऑक्सिजन ऑडिट तसंच फायर ऑडिट याबाबत चर्चा झाल्याचं पवार यांनी सांगितलं.

बारामतीप्रमाणे पुण्यातही जिथे रुग्णसंख्या वाढत आहे तिथल्या प्रशासनाने तेथील कोरोना रुग्णसंख्या, भौगोलिक परिस्थिती, बेड्सची संख्या विचारात घेऊन निर्णय घ्यावा. असेही निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. रुग्णसंख्या जास्त असलेल्या शहरांमध्ये लॉकडाऊन करण्याचा सुचना हायकोर्टाने दिल्या होत्या. हायकोर्टाच्या सूचनेनंतर आज पुण्यात सर्वाधिक रुग्णसंख्या असल्याने आढावा बैठक पार पडली. या बैठकीत कडक लॉकडाऊनबाबत निर्णय होणार की नाही याबाबत उत्सुकता होती. परंतु पुण्यात निर्बंध कडक करण्याच्या सूचना दिल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. त्यामुळे पुण्यात अद्याप पूर्ण लॉकडाऊन लागू होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, काही लोकप्रतिनिधींनी लॉकडाऊन करण्याची गरज असल्याचे सांगितले. सकाळी काही दुकाने उघडी असतात, लोक अनेक कारणे सांगत पोलिसांना अडचणी निर्माण करतात, पण आत्ता आहे तशाच पद्धतीने चालू ठेवून निर्बंध करावेत अशा सूचना दिल्या आहेत. कारण नसताना बाहेर पडणाऱ्यांची संख्या कमी झाल्यास परिणाम चांगला मिळेल असा विश्वास अजित पवार यांमी व्यक्त केला.

या आठवड्यात चांगले परिणाम दिसत आहेत. पुण्यातील फक्त ग्रामीण भागात रुग्ण वाढले आहेत. हायकोर्टाने कडक लॉकडाऊनबाबत सूचना केली आहे. पण मला त्याबाबत जास्त काही बोलायचं नाही. पोलिसांशी आम्ही बोललो, त्यांच्या अडचणी आहेत. पुण्याच्या लॉकडाऊन बाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, असं अजित पवार म्हणाले.

कोरोना रुग्णसंख्येवरून मुंबई आणि पुण्याची तुलना व्हायला लागली आहे. हायकोर्टाने तसेच सुप्रीम कोर्टाने मुंबईत कोरोना रोखण्यासाठी सुरु असलेल्या कामांची स्तुती केली. व इतर राज्यांनी देखील त्याप्रमाणे उपक्रम राबवण्याचे आवाहन केले, दरम्यान पुण्याचा कोरोना आकडेवारीमध्ये फक्त पुणे शहराची आकडेवारी जात नाही तर यात पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे जिल्हा ग्रामीण भाग असा सगळ्यांचा मिळून आकडा जातो. तो आकडा पाहता सर्वांना विचार करायला लावणारा आकडा आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले.


Today Gold Price: अक्षय तृतीयाच्या मुहूर्तापर्यंत सोन्याचा दरात होणार मोठी घसरण, जाणकारांचे मत


 

First Published on: May 7, 2021 3:31 PM
Exit mobile version