Cow milk rates: गाईच्या दुधाच्या किमतीत पुन्हा वाढ

Cow milk rates: गाईच्या दुधाच्या किमतीत पुन्हा वाढ

मागील अनेक दिवसांपासून महागाईनं सर्वसामान्यांना नकोसं केलं आहे. एकीकडं इंधनाचे दर वाढत आहेत, तर दुसरीकडे जीवनाश्यक वस्तूंच्या किंमतीही वाढत आहेत. अशातच दुधाच्या किंमतीही वाढल्या आहेत. पुणे जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ कात्रज डेअरीने गाईच्या दुधाचा खरेदी दर प्रतिलिटर आणखी दोन रुपयांनी वाढवला आहे. मागील तीन आठवड्यातील ही तिसरी दरवाढ आहे. या नव्या निर्णयानुसार कात्रज डेअरी जिल्ह्यातील सोमवारपासून शेतकऱ्यांकडून आता प्रतिलिटर ३५ रुपये लिटरने गाईचे दूध खरेदी करणार आहे.

इंधनाच्या दरात सातत्याने होत असलेली वाढ, पशुखाद्याचे वाढलेले दर, आणि दूध उत्पादनात झालेली घट लक्षात घेऊन निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, गाईच्या दुध लिटरमागे २ रुपये वाढवून तो ३३ रुपयांऐवजी ३५ रुपये इतका देण्याची मोठी घोषणा केली. आता या नव्या निर्णयाची अंमलबजावणी ११ एप्रिलपासून होणार आहे. यासंदर्भात पुणे जिल्हा सहकारी दूध संघाच्याअध्यक्षपदाची केशरताई पवार यांनी येताच तीनच दिवसांत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.

दुधाच्या खरेदी दरात वाढ झाली असली तरी पुणे शहरातील दूध विक्री दर मात्र आहे तेच राहणार आहेत. दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्याच संस्थेला दूध द्यावे, या उद्देशाने खासगी आणि सहकारी दूध संघांनी खरेदी दर वाढविण्यास सुरवात केली आहे. त्यातूनच दूध खरेदी दरात कधीही प्रतिलिटर ३० रुपयांच्या वर न जाणाऱ्या दूध संघांनी देखील खरेदी दर ३५ रुपयांपर्यंत नेले आहेत.


हेही वाचा – इंग्रजांच्या काळात तरी न्याय मिळायचा, आता काय चाललंय- छगन भुजबळ

First Published on: April 8, 2022 1:04 PM
Exit mobile version