एका पुणेकराला दिसला ‘एलियन’, पंतप्रधानांना लिहीले पत्र

एका पुणेकराला दिसला ‘एलियन’, पंतप्रधानांना लिहीले पत्र

प्रातिनिधिक फोटो

पुण्यातला एका व्यक्तीने त्याला आपल्या घराबाहेर ‘एलियन’ (परग्रहावरुन आलेला प्राणी) दिसल्याचा दावा केला आहे. मी त्या एलियनशी संवाद साधला असल्याचंही या व्यक्तीने सांगितलं आहे. विशेष म्हणजे याबाबत त्याने पंतप्रधान कार्यालयाला एक पत्रदेखील पाठवलं आहे. दरम्यान, या पत्राची गंभीर दखल घेत पीएमओने याबाबत राज्यसरकारकडे विचारणी केली आहे. हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, याबाबत शहानिशा करण्याचे आदेश मिळताच पुणे पोलिसांनी त्या व्यक्तीचा शोध घ्यायला सुरुवात केली. या शोधकऱ्यात पुणे पोलिसांच्या नाकीनऊ आले. बऱ्याच तपासानंतर अखेर त्यांनी सदर व्यक्तीला शोधून काढले. चौकशीदरम्यान ही व्यक्ती मानसिक आजारी असल्याची बाब पोलिसांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी तातडीने पंतप्रधान कार्यालयाला याबाबत पत्र पाठवून माहिती दिली. संबंधित व्यक्तीने पीएमओला पाठवलेल्या पत्रामध्ये त्याला त्याच्या घराच्या खिडकीमधून एक एलिअन सदृश्य व्यक्ती दिसल्याचा दावा केला आहे. एलियनसारखी दिसणारी ती व्यक्ती पृथ्वी ग्रहासंबंधीची संवेदनशील माहिती मला पाठवत असल्याचंही, त्या व्यक्तीने पत्रात म्हटलं आहे.

याबाबत पंतप्रधान कार्यालयाने लवकरात लवकर सत्याचा शोध घ्यावा आणि एलियन देत असलेल्या माहितीचा छडा लावावा, या उद्देशातून सदर व्यक्तीने पंतप्रधान कार्यालयाला यासंबंधी इ-मेल पाठवला. त्यानंतर हा मेल पीएमओकून राज्य सरकारकडे फॉरवर्ड करण्यात आला आणि संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर राज्य सरकारकडून पुणे पोलिसांना प्रकरणाची पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले.  त्यानुसार, सिंहगड पोलिसांनी तपास सुरू केला आणि पीएमओला इ-मेल पाठवणाऱ्या त्या व्यक्तीला शोधून काढले. पोलिसांच्या चौकशीदरम्यान सदर व्यक्ती मानसिक रुग्ण असल्याचे समोर आले. चौकशीदरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्यात राहणाऱ्या या ४७ वर्षीय व्यक्तीला काही वर्षांपूर्वी ब्रेन हॅमरेजचा स्ट्रोक आला होता. तेव्हापासून त्याचे मानसिक स्वास्थ्य पूर्णत: बिघडले होते. त्यामुळे या व्यक्तीने आपल्या बंगल्याबाहेरील झाडांमधील दिव्याला एलियन समजल्ं असावं, असा पुणे पोलिसांचा अंदाज आहे.


वाचा : भयंकर! आईनेच केला आपल्या बाळाचा खून

First Published on: December 28, 2018 2:12 PM
Exit mobile version