‘तो’ मोडलेला संसार अखेर पुणे पोलिसांमुळे सावरला

‘तो’ मोडलेला संसार अखेर पुणे पोलिसांमुळे सावरला

पती पत्नीत भांडणं झाली नाही तर तो संसार नाही असे म्हटले जाते. परंतु या भांडणाच्या छोट्या कारणांना काही पत्नी-पती मोठ स्वरुप देत थेट विभक्त होण्यापर्यंतचा निर्णय घेतात. त्यात लॉकडाऊनच्या काळात पती पत्नीतील भांडणे, वाद, घरगुती हिंसाचाराच्या अनेक घटना समोर आल्या. अशाचप्रकरची एका घटना लॉकडाऊनच्या काळात पुण्यात घडली आहे. पुण्यात राहणाऱ्या एका दामपत्यामध्ये वाद झाले. त्यामुळे दोघांनी एकमेकांशी संपर्क बंद केले. तसेच संपर्क क्रमांक देखील ब्लॉक केले होते. परंतु पतीला पत्नीसोबत पुन्हा संसार करायचा असल्याने पतीने पुढाकार घेत भरोसा सेलच्या मदतीने पत्नीला पुन्हा आपलेसे केले. त्यामुळे दोघांचा सोन्यासारखा विस्कटलेले संसार भरोसा सेलमुळे पुन्हा सुरु झाला आहे.

कोरोना काळात या दाम्पत्यामध्ये काही कारणावरुन वाद झाले परंतु हा वाद इतका टोकाला गेला की दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. या वादामुळे पत्नी माहेरी निघून गेली. दोघांनी घरच्यांच्या सहमतीने लग्न केले होते. परंतु तरीही दोन्ही कुटुंबियांनी दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केले नाही. त्यातचं लॉकडाऊनमध्यये पतीला वर्क फ्रॉम होम असल्याने सुरुवातीला काही वाटले नाहीय परंतु नंतर त्याला एकटेपणा जाणवू लागला. तो नैराश्येत येत त्याला आत्महत्येचा विचार मनात येत होता. त्यामुळे आता काय करावे त्याला सुचत नव्हते. दरम्यान राज्यात लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले त्यावेळी पतीने भरोसा सेल विभागाकडे पत्नीला पुन्हा घरी आणण्यासाठी मदत अर्ज दाखल केला. यानंतर भरोसा सेल विभागाने संबंधित पतीच्या पत्नीशी संवाद साधला आणि गैरसमज दूर करत दोघांना पुन्हा एकत्र आणलं. त्यामुळे दाम्पत्याचा मोडलेला संसार पुन्हा एकत्र सुरु आला आहे.

First Published on: January 16, 2021 9:56 AM
Exit mobile version