पुणे : व्हेंटिलेटर न मिळाल्याने निवृत्त शास्त्रज्ञाचा मृत्यू

पुणे : व्हेंटिलेटर न मिळाल्याने निवृत्त शास्त्रज्ञाचा मृत्यू

व्हेंटिलेटर न मिळाल्याने निवृत्त शास्त्रज्ञाचा मृत्यू

पुण्यात एका निवृत्त शास्त्रज्ञाचा व्हेंटिलेटर न मिळाल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. डॉ. पी. लक्ष्मी नरसिंहन (६१) असे या शास्त्रज्ञाचे नाव असून त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमके काय घडले?

पुण्यातील एका निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. पी. लक्ष्मी नरसिंहन यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे त्यांना एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांना वेळेवर व्हेंटिलेटर उपलब्ध झाले नाही. त्यामुळे त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. पण, त्यांना व्हेंटिलेटर न मिळाल्याने निवृत्त शास्त्रज्ञाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्यांची कोरोना चाचणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यामागे त्यांची पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे.

डॉ. पी. लक्ष्मी नरसिंहन यांच्याविषयी

पुण्यातील बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियामध्ये डॉ. पी. लक्ष्मी नरसिंहन हे वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होते. तसेच ते काही वर्षांपूर्वी निवृत्त झाले होते.


हेही वाचा – Corona Update: राज्यात २४ तासांत ७,९७५ नवे रूग्ण; २३३ जणांचा मृत्यू


 

First Published on: July 15, 2020 10:27 PM
Exit mobile version