Pawar VS Pawar : शेवटच्या सभेत डोळ्यांतून अश्रूही येतील; अजितदादांचा शरद पवारांवर निशाणा

Pawar VS Pawar : शेवटच्या सभेत डोळ्यांतून अश्रूही येतील; अजितदादांचा शरद पवारांवर निशाणा

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात (7 मे) होणाऱ्या निवडणुकीत बारामती मतदारसंघात मतदान होणार आहे. मात्र येथील मतदारसंघ निवडणुकीआधीच चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. याठिकाणी पवार विरुद्ध पवार आणि नणंद -भावजय अशी लढत होत आहे. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांचा प्रचार करताना पवार कुटुंबातील अनेक सदस्य आमने-सामने येत आहेत. खासकरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे एकमेकांवर टीका-टिप्पणी करताना दिसत आहेत. अजित पवार यांनी नुकतेच शरद पवार यांचे नाव न घेता भविष्यवाणी केली आहे. निवडणुकीत तुम्हाला भावनिक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शेवटच्या सभेत त्यांच्या डोळ्यांतून अश्रूही येतील, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. अजित पवार कण्हेरी येथील सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सभेत बोलत होते. (Lok Sabha Election 2024 Ajit Pawar targeted Sharad Pawar)

अजित पवार म्हणाले की, या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आपण महायुतीसोबत जाण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे तुमच्या भविष्याचा, संसाराचा विचार करून महायुतीच्याच उमेदवाराला निवडून द्या. कारण तुम्हाला या निवडणुकीत भावनिक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शेवटच्या सभेत डोळ्यांतून अश्रूही येऊ शकतात. पण तुम्ही भावनिक होऊ नका, असे आवाहन अजित पवार यांनी उपस्थितांना केले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला.

हेही वाचा – Lok Sabha : पीयूष गोयल यांच्याकडून आचारसंहितेचे उल्लंघन; उमेदवारी रद्द करण्याची काँग्रेसची मागणी

बारामतीत अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून दडपशाही सुरू असल्याचा आरोप रोहित पवार सातत्याने करत आहेत. त्यामुळे आजच्या सभेत अजित पवार यांनी रोहित पवार यांचे नाव न घेता त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अजित पवार म्हणाले की, मतदानासाठी माझ्याकडून धमकावले जात असल्याचा आरोप काहीजण करत आहेत. मात्र, आपण कोणाला मतासाठी धमकावत बसलो असतो तर लोकांनी मला एवढ्या मतांनी निवडून दिले असते का? शारदा नगर परिसरात काय चाललेय ते बघा? असा सवाल करत अजित पवार म्हणाले की, एका शिक्षिकेच्या मुलाकडून घड्याळाचा प्रचार सुरू असल्यचाे कारण तिला कामावरून कमी करण्यात आलं आहे, असा आरोप अजित पवार यांनी यावेळी केला.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : केवळ अमित शहाच नव्हे तर, फडणवीसांनीही शब्द फिरवला, ठाकरेंचा आरोप

Edited By – Rohit Patil

First Published on: April 20, 2024 6:31 PM
Exit mobile version