पुणतांब्यातील शेतकऱ्यांच्या मुलींचे अन्नत्याग आंदोलन मागे

पुणतांब्यातील शेतकऱ्यांच्या मुलींचे अन्नत्याग आंदोलन मागे

पुणतांब्यातील अन्नत्याग आंदोलन मागे

पुणतांबा येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलनाला बसलेल्या मुलींनी आज अखेर पाचव्या दिवशी आंदोलन मागे घेतले आहे. आंदोलक मुलींच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकार पाठपुरावा करेल, असे आश्वासन कृषी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. पुणतांब्यातील आंदोलनकर्त्या मुलींना काल रात्री उशिरा पोलिसांनी शासकीय रुग्णालयात जबरदस्तीने दाखल केले होते. पोलिसांनी बळजबरीने ही कारवाई केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. यावरुन मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता.

जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील, असा इशारा मुलींनी दिला होता. आंदोलनकर्त्या मुलींपैकी शुभांगी जाधव या मुलीला अस्वस्थ वाटत असल्याने तिला ताबडतोब रग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर पोलिसांनी शुक्रवारी तिच्या सोबत आंदोलन करत असलेल्या मुलींचीही जबरदस्तीने रुग्णालयात रवानगी केली. मुलींची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले असल्याचे पोलिसांनी सांगितले. परंतु हे आंदोलन दडपले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आणि या कारणाने ते रस्त्यावर देखील उतरले होते.

आश्वासनानंतर आंदोलन मागे

आंदोलन स्थळावरील मंडपही पोलिसांनी काढून टाकला आणि तेथे आंदोलन करणाऱ्या काही जणांना ताब्यात घेतले. यामध्ये उपोषणकर्त्या मुलींच्या कुटुंबियांचाही समावेश आहे. शिर्डीचे शिवसेना पक्षाचे खासदार सदाशिव लोखंडे म्हणाले की, पोलीस जोपर्यंत निरपराध शेतकऱ्यांना सोडत नाही, तोपर्यत आंदोलन सुरूच ठेवणार. शुक्रवारी पालकमंत्री राम शिंदे यांनी आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा केली. पण ती देखील निष्फळ ठरली. आंदोलक मुलींच्या मागण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून लवकरच निर्णय घेऊ, असे खोतकर यांनी सांगितले. आंदोलनाच्या दरम्यान पोलीस प्रशासनाकडून झालेल्या दडपशाहीच्या प्रकाराची चौकशी केली जाईल, असंही त्यांनी सांगितले. या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

आंदोलनकर्त्यामच्या मागण्या

 

First Published on: February 9, 2019 4:03 PM
Exit mobile version