Rahul Narwekar : व्हीप पक्षाचाच लागू होणार… राहुल नार्वेकरांनी दिले संकेत

Rahul Narwekar : व्हीप पक्षाचाच लागू होणार… राहुल नार्वेकरांनी दिले संकेत

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबत गुरुवारी, आज पुन्हा सुनावणी होणार आहे.

 

मुंबईः सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व्हीप हा राजकीय पक्षाच्या ईच्छेनुसारच लागू होतो. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रमुखाचा व्हीपबाबत काय निर्णय आहे. हा निर्णय पक्षाच्या घटनेनुसार घेतलेला आहे का? हे सर्व तपासूनच मी राष्ट्रावादी कॉंग्रेस पक्षाच्या व्हीपचा निर्णय घेणार आहे, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले.

हेही वाचाःSC : 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय दोन आठवड्यात घ्या; ठाकरे गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव

अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे काही आमदार रविवारी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये बंडाची ठिणगी पडली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी कार्यकारिणीत बदल केले. जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष पदावरुन हक्कालपटी करत सुनील तटकरे यांची त्यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली. अनिल पाटील यांनाच व्हीप म्हणून कायम ठेवत आमदार जितेंद्र आव्हाड यांची व्हीप म्हणून केलेली नियुक्ती रद्द करण्यात आली. तर दुसरीकडे शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदावरून आणि सुनील तटकरे यांची राष्ट्रीय सचिव पदावरुन हक्कालपटी केली.

त्यानंतर विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्याकडे व्हीपबाबत अर्ज दाखल झाले. राष्ट्रवादीच्या व्हीपचा निर्णय कधी घेतला जाणार, असा प्रश्न नार्वेकर यांना विचारण्यात आला. त्यावर नार्वेकर यांनी वरील उत्तर दिले. राष्ट्रवादीच्या व्हीपसंदर्भात नार्वेकर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय वेळेतच घेणार

शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा वेळेतच घेतला जाईल. उशीर करणार नाही. पण कायद्याच्या विरोधात निर्णय जाईल असेही काही करणार नाही. त्यामुळे लवकरच याचा निर्णय घेणार, असे विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी दोन आठवड्यात घ्यावा, यासाठी ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका केली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना नार्वेकरांनी हे स्पष्टीकरण दिले.

First Published on: July 4, 2023 6:48 PM
Exit mobile version