बाळासाहेबांच्या घटनेवर आधारित आम्ही सर्व गोष्टी केल्या, राहुल शेवाळेंची प्रतिक्रिया

बाळासाहेबांच्या घटनेवर आधारित आम्ही सर्व गोष्टी केल्या, राहुल शेवाळेंची प्रतिक्रिया

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह नेमकं कुणाचं?, यावर केंद्रीय निवडणूक आयोगाची सुनावणी पार पडली. उद्धव ठाकरे आणि शिंदे गट अशा दोन्ही गटाकडून पक्षावर दावा सांगण्यात आला आहे. दोन्ही गटांच्या बाजुंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर ३० जानेवारीला लेखी उत्तर दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहे. दरम्यान, बाळासाहेबांच्या घटनेवर आधारित आम्ही सर्व गोष्टी केल्या, अशा प्रतिक्रिया शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिली आहे.

राहुल शेवाळे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते म्हणाले की, आज दोन्ही गटाकडून युक्तीवाद करण्यात आला. तसेच दोन्ही गटाची बाजू ऐकल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने काही म्हणणे असेल तर लेखी उत्तर द्या, असे निर्देश दोन्ही गटाला देण्यात आले आहेत. हे लेखी उत्तर येत्या ३० जानेवारीपर्यंत दोन्ही गटाला द्यावे लागणार आहे. बाळासाहेबांची घटना आणि उद्धव ठाकरेंनी बनवलेली घटना तसेच आता जी नवीन घटना तयार झाली आहे, या तीन गोष्टींवर युक्तीवाद झाला.

पक्षाच्या घटनेवर युक्तिवाद झाला असून लोकप्रतिनिधी गरजेचे आहेत. परंतु लेखी उत्तर दिल्यानंतर निवडणूक आयोग यावर आपला निर्णय देईल. बाळासाहेबांच्या घटनेवर आधारित आम्ही सर्व गोष्टी केल्या आहेत. उद्धव ठाकरेंनी जी घटना बदलली त्यावरच आज युक्तीवाद झाला, असंही राहुल शेवाळे म्हणाले.

विजय आमचाच होणार – आदित्य ठाकरे

विजय आमचाच होणार, नेहमी सत्याचाच विजय होतो. हा विषय आपण किती दिवस प्रलंबित ठेवणार आहोत. किती दिवस आपण तारीख पे तारीख करत राहणार आहोत. आपल्या देशात जो कायदा आणि संविधान आहे. संविधानाचा अनादर करून असं सरकार बसू शकतं का?, आपल्या देशात सत्यमेव जयते ला महत्त्व सत्तामेव जयतेला नाही, असं शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे म्हणाले.

धनुष्यबाण आणि पक्षाचं नाव आम्हालाच – अनिल परब

शिंदे गटाच्या याचिकेत जे मुद्दे होते, ते सगळे मुद्दे खोडून काढले आहेत. याचिकेतील त्रुटी, शिवसेनेच्या घटनेत केलेली दुरुस्ती, घटनेची केलेली मोडतोड या सर्व बाबी निवडणूक आयोगासमोर आणल्या आहेत. त्यामुळे मला पूर्णपणे खात्री आहे. धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आणि पक्षाचं नाव आम्हालाच मिळेल, असं ठाकरे गटाचे नेते अनिल परब म्हणाले.


हेही वाचा : शिवसेना बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आम्हा सर्वांचीच – आदित्य ठाकरे


 

First Published on: January 20, 2023 9:33 PM
Exit mobile version