महाराष्ट्राच्या दिशेने आणखी एक ऑक्सिजन एक्सप्रेस रवाना, रेल्वे मंत्र्यांनी दिली माहिती

महाराष्ट्राच्या दिशेने आणखी एक ऑक्सिजन एक्सप्रेस रवाना, रेल्वे मंत्र्यांनी दिली माहिती

महाराष्ट्राच्या दिशेने आणखी एक ऑक्सिजन एक्सप्रेस रवाना, रेल्वे मंत्र्यांनी दिली माहिती

महाराष्ट्रात कोरोना प्रादुर्भावाचा उद्रेक झाला आहे. वाढत्या कोरोना रुग्णांमुळे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात ऑक्सिजन तुटवडा झाल्यामुळे इतर राज्यांतून ऑक्सिजन एक्सप्रेसद्वारे ऑक्सिजन आणण्यात येत आहे. विशाखापट्टनमवरुन पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर आता गुजरातमधून महाराष्ट्र्च्या दिशेने आणखी एक ऑक्सिजन एक्सप्रेस रवाना झाली आहे. महाराष्ट्र सरकारने ऑक्सिजन वाढवून मागितले होते. केंद्र सरकारने अधिक ऑक्सिजनचा पुरवठा करत गुजरातमधून ऑक्सिजन एक्सप्रेस रवाना झाल्याची माहिती रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिली आहे.

राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे ऑक्सिजन वाढवून द्यावा अशी मागणी राज्य सरकारने केली होती. यानंतर महाराष्ट्राच्या दिशेने ऑक्सिजन एक्स्प्रेस ऑक्सिजन घेऊन रवाना झाली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे की, गुजरातमधील हापा येथून महाराष्ट्रातील कळंबोलीच्या दिशेने लिक्विड मेडिकल ऑक्सिजन घेऊन रवाना झाली आहे. ही ऑक्सिजन एक्सप्रेस रेल्वे राज्यातील ऑक्सिजन साठा वाढवेल त्यामुळे कोरोना विरुद्धातील लढाई लढण्यास मदत केली आहे.

विशाखापट्टनमधून ऑक्सजन एक्सप्रेस महाराष्ट्रात दाखल

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांना ऑक्सिजन तुटवडा निर्माण झाल्यानंतर विशाखापट्टनमला ऑक्सिजन एक्सप्रेस रवाना केली होती. २० एप्रिल रोजी महाराष्ट्रातून विशाखापट्टनम येथे ऑक्सिजन एक्सप्रेस रवाना करण्यात आली होती. ही ट्रेन विशाखापट्टनम, जमशेदपूर,राऊरकेला आणि बोकारो येथे ऑक्सिजनसाठी गेली होती. राज्य सरकारने केंद्र सरकारला रेल्वे मार्फत ऑक्सिजन पुरवठा करण्याची मागणी केली होती. त्यामुळे जलद वाहतूक करण्यासाठी ट्रेनने ऑक्सिजन पुरवठा करणे सोयीस्कर झाले आहे. विशाखापट्टनमहून २३ तारखेला ऑक्सिजन एक्सप्रेस गोंदियामध्ये दाखल झाली त्यानंतर नागपूर, नाशिकमध्ये दाखल झाली. ऑक्सिजन एक्सप्रेस महाराष्ट्रात दाखल झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु पुढील काळात आणखी ऑक्सिजन पुरवठा व्हावा यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारकडे मागणी करत आहे.

First Published on: April 25, 2021 9:02 PM
Exit mobile version