चाकरमान्यांसाठी रेल्वे तयारीक

चाकरमान्यांसाठी रेल्वे तयारीक

Konkan Railway: कोकण रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदा इलेक्ट्रिक इंजिनवर धावली एक्सप्रेस

गणेशोत्सव म्हटला की कोकण रेल्वे मार्गावर तुडूंब गर्दी असते.या सर्वाचे नियोजन करताना रेल्वेची खरी कसरत असते. या वर्षी देखील कोकण रेल्वे, मध्य, पश्चिम रेल्वेने कंबर कसली आहे. कोकणात जाणार्‍या सर्व गणेशभक्तांचा प्रवास सुखरूप होण्यासाठी रेल्वेकडून प्रवासाभिमुख सेवांची जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्यासाठी रेल्वेने जादा तिकीट खिडक्यांबरोबरच वैद्यकीय मदत आदी सुविधाही पुरवल्या आहेत. तसेच सुरक्षा बलाच्यावतीने ऑपरेशन क्यू सुरू करण्यात येणार आहे. या ऑपरेशनमध्ये प्रवाशांना एका रांगेत मेल, एक्स्प्रेसमध्ये चढण्या-उतरण्याचे आवाहन रेल्वे सुरक्षा बलाकडून केले जाणार आहे.

गणेशोत्सव कालावधीत वेगवेगळ्या गाड्यांमध्ये फुकट्या प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता गृहीत धरून तिकीट तपासणी मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली जाणार आहे. खाद्यपदार्थ स्टॉलवर बेबी फूड उपलब्ध असेल. रेल्वेच्या काही स्थानकांवर प्रथोमपचार आणि आरोग्य कक्ष सुविधा देखील असणार आहेत. या वर्षीपासून प्रत्येक प्रवाशाला त्याच्या इच्छित गाडीमध्ये बसविण्याचे मार्गदर्शन रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीने करण्यात येणार आहे.

प्रत्येक स्थानकावरील पादचारी पूल आणि रेल्वेतून चढताना-उतरताना डाव्या बाजूचा वापर करण्याचे आवाहन रेल्वे सुरक्षा बलाच्यावतीने करण्यात येत आहे. ‘माय लेफ्ट इज माय राइट’ या संकल्पनेची माहिती ऑपरेशन क्यूमध्ये दिली जाणार आहे. गर्दीच्या अनुषंगाने रेल्वे सुरक्षा बलाच्या जादा तुकड्या तैनात केल्या जातील.

1) जादा विशेष गाड्यांच्या २१० फेर्‍या

2) ६४७ अतिरिक्त डबेही जोडणार

3) दादर-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसला ३० ऑगस्टपासून सावंतवाडीत थांबा

4) ११ टपाल खात्यांत, १७ रेल्वे स्थानकांत पीआरएस सिस्टम

5) १६ ठिकाणी टाऊन बुकिंग एजन्सी

6) रेल्वे सुरक्षा दलाचे २०४ जवान,होमगार्ड तैनात

First Published on: August 29, 2019 5:19 AM
Exit mobile version