१ जूनपासून मुंबई, पुण्यातून दररोज विशेष रेल्वे सुटणार; यादी पाहा

१ जूनपासून मुंबई, पुण्यातून दररोज विशेष रेल्वे सुटणार; यादी पाहा

लोकमान्य टिळक टर्मिनन्स स्थानक

रेल्वे मंत्रालयाने ठरविल्यानुसार सामान्य प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या १ जून पासून चालविणार असल्याचे सांगितले आहे. १ मे पासून चालविण्यात येणाऱ्या श्रमिक विशेष ट्रेन आणि २२ मे पासून विशेष वातानुकूलित गाड्या चालविण्याव्यतिरिक्त या विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत.

विशेष रेल्वेची यादी –

१. लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर
स्थानक – लोकमान्य टिळक टर्मिनस

२. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – भुवनेश्वर
स्थानक – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

३. लोकमान्य टिळक टर्मिनस – दरभंगा विशेष
स्थानक – लोकमान्य टिळक टर्मिनस

४. लोकमान्य टिळक टर्मिनस – वाराणसी विशेष
स्थानक – लोकमान्य टिळक टर्मिनस

५. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – वाराणसी विशेष
स्थानक – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

६. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – गदग
स्थानक – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

७. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – बेंगलुरू विशेष
स्थानक – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

८. लोकमान्य टिळक टर्मिनस – पाटलीपुत्र जं. विशेष
स्थानक – लोकमान्य टिळक टर्मिनस

९. पुणे – दानापूर विशेष
स्थानक – पुणे

वरील सर्व विशेष गाड्यांचे बुकिंग आयआरसीटीसी वेबसाइट www.irctc.co.in आणि मोबाइल अ‍ॅपद्वारे जास्तीत जास्त ३० दिवसांच्या एआरपी (आगाऊ आरक्षण कालावधी) नुसार ऑनलाईन सुरू आहे. तसेच कोणत्याही रेल्वे स्थानकावरील आरक्षण काऊंटरवर तिकिटे आरक्षित केली जाणार नाहीत. ‘एजंट’, (आयआरसीटीसी एजंट आणि रेल्वे एजंट दोघे) यांच्यामार्फत तिकिट बुक करण्यास परवानगी नाही.

या वातानुकूलित आणि बिगर वातानुकूलित दोन्ही वर्ग असलेल्या विशेष गाड्या पूर्णपणे राखीव गाड्या असतील. सामान्य द्वितीय श्रेणी (जीएस) डब्ब्यातही बसण्यासाठी राखीव जागा असेल. भाडे सामान्य असेल आणि सामान्य द्वितीय श्रेणी (जीएस) डब्ब्यांसाठी राखीव असल्यास, द्वितीय आसन (२ एस) श्रेणीचे भाडे आकारले जाईल आणि सर्व प्रवाशांना जागा देण्यात येईल. अस्तित्त्वात असलेल्या नियमांनुसार RAC आणि प्रतीक्षा यादी तयार केली जाईल, परंतु प्रतिक्षा यादीतील तिकीट धारकांना ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी दिली जाणार नाही.

प्रवाशांसाठी महत्त्वाच्या सूचना

१. सर्व प्रवाशांची अनिवार्यपणे तपासणी करण्यात येईल आणि केवळ लक्षणं नसलेल्या प्रवाशांना ट्रेनमध्ये प्रवेश करण्यास / बसण्यास परवानगी आहे.

२. केवळ पुष्टीकृत (Confirmed) तिकिट असलेल्या प्रवाशांनाच रेल्वे स्थानकात प्रवेश देण्यात येईल.

३. सर्व प्रवाशांनी प्रवेशावेळी आणि प्रवासादरम्यान चेहरा कव्हर / मुखपट्टी घातले असले पाहिजेत.

४. स्टेशनवर थर्मल स्क्रिनिंग सुलभ करण्यासाठी प्रवासी कमीतकमी ९० मिनिटे आधी स्टेशनवर पोहोचले पाहिजेत.

५. प्रवाशांनी स्टेशनवर आणि ट्रेनमध्ये सामाजिक अंतर ठेवले पाहिजे.

६. त्यांच्या गंतव्यस्थानावर आगमन झाल्यानंतर, प्रवाश्यांना गंतव्य राज्य / केंद्रशासित प्रदेशांनी सूचित केलेल्या आरोग्य प्रोटोकॉलचे पालन करावे लागेल.

First Published on: May 22, 2020 1:36 PM
Exit mobile version