तुरळक पावसाने महामार्गावर खड्डे

तुरळक पावसाने महामार्गावर खड्डे

सर आली धावून, रस्ता गेला वाहून, अशी स्थिती महिनाभरापूर्वी काम करण्यात आलेल्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गाची झाली आहे. पावसाळ्याचे पुढील महिने प्रवास कसा असेल, ही चिंता प्रवाशांना सतावत आहे.महामार्गाच्या खालापूर ते खोपोली दुपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. सात किलोमीटरचा रस्ता दोन वर्षांपासून पूर्ण न झाल्याने प्रवाशांची ङोकेदुखी वाढली आहे. महिन्याभरापूर्वी खालापूर हद्दीत शेडवली दरम्यान डांबरीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले होते. परंतु संबंधित कंत्राटदाराने कामाचा दर्जा योग्य राखला नसल्याचे तुरळक पडलेल्या पावसात उघड झाले आहे. खडीसह डांबर वर आले असून, अर्धा फुटाचा खड्डा पडल्याने रस्ता धोकादायक झाला आहे.

गेल्यावर्षी देखील पावसात रस्त्याची प्रचंड दुर्दशा झाली होती. कंत्राटदाराविरोधात अनेक तक्रारी झाल्या होत्या. तरी सुद्धा कंत्राटदाराला गांभीर्य नसल्याचे दिसून येत असून कामाचा दर्जा न राखल्यास दंडात्मक कारवाई व्हावी यासाठी पाठपुरावा करू. -विशाल वाघमारे, सदस्य, दिलासा फाऊंडेशन, रस्ता सुरक्षा अभियान

First Published on: June 28, 2019 4:44 AM
Exit mobile version