महाराष्ट्रात 27 जिल्ह्यांत कोसळणार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज

महाराष्ट्रात 27 जिल्ह्यांत कोसळणार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज

केरळमध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे आगमन झाल्यानंतर मान्सून कर्नाटक किनापट्टीच्या बहुतांश भागात दाखल झाला आहे. मान्सून गोव्याच्या सीमेवर रेंगाळला असून वेळेआधी मान्सून राज्यात दाखल होईल, हा हवामान खात्याचा अंदाज त्यामुळे चुकला आहे. दरम्यान पुढील काही दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हे जिल्हे वगळता राज्यात पाऊस –
उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह, ठाणे, पालघर, नंदुरबार, धुळे जळगाव, भंडारा आणि गडचिरोली जिल्हे वगळता राज्यात सर्वच जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे काही तासांत वरील जिल्हे वगळता राज्यात सर्व भागात पूर्व मोसमी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवस कमी अधिक प्रमाणात हीच स्थिती कायम राहणार आहे.

या जिल्ह्यांना यलो येलो अलर्ट –
हवामान खात्याने आज पुण्यासह सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली, नाशिक, बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. पुढील काही तासांत या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.

दक्षिण कोकणात पूर्व मोसमी पाऊस मान्सूनसाठी पोषक –
मान्सूनच्या आगमनासाठी दक्षिण कोकणात पूर्व मोसमी पावसाची आवश्यकता असते. राज्यात पूर्व मोसमी पावसामुळे मान्सूनच्या आगमनासाठी पोषक हवामान तयार होते. चार दिवस दक्षिण कोकणात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे स्थिती मान्सूनच्या आगमानासाठी फायदेशीर ठरणार आहे.

First Published on: June 8, 2022 10:20 PM
Exit mobile version