आज औरंगाबादेत राजगर्जना !

आज औरंगाबादेत राजगर्जना !

मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसा पठणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असताना रविवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये, तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत सभा होत आहे. या दोन्ही सभांमधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अर्थात शिवसेनेला लक्ष्य केले जाण्याची दाट शक्यता आहे.

मनसेने राज ठाकरे यांच्या औरंगाबादच्या सभेसाठी जोरदार वातावरण निर्मिती केली आहे. ठाण्यातील उत्तर सभेनंतर राज औरंगाबादला काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण ३ मेनंतर म्हणजे रमजान ईद झाल्यावर मशिदींवरील भोंगे उतरविले नाहीत, तर मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यांच्या इशार्‍याची मुदत दोन दिवसांत संपणार आहे. त्यामुळे राज आजच्या सभेत आणखी कोणता नवा आदेश मनसैनिकांना देतात याची उत्सुकता आहे,

तर मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून भाजपने महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र चिंतन, महाराष्ट्र वंदन या कार्यक्रमाचे रविवारी सायनच्या सोमय्या मैदानात आयोजन केले आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या माध्यमातून मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावर बोट ठेवून शिवसेनेवर हल्लाबोल करण्याची तयारी भाजपने केली आहे. याच सभेत भाजप मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकून शिवसेनेला सत्तेतून खाली खेचण्याचा निर्धार करण्याचीही शक्यता आहे.

First Published on: May 1, 2022 7:00 AM
Exit mobile version