…तर महाराष्ट्रात ‘योगी’ नसून सत्तेचे ‘भोगी’; भोंगे उतरवल्यानंतर योगींचे कौतुक करत राज यांचा सरकारवर निशाणा

…तर महाराष्ट्रात ‘योगी’ नसून सत्तेचे ‘भोगी’; भोंगे उतरवल्यानंतर योगींचे कौतुक करत राज यांचा सरकारवर निशाणा

उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारच्या निर्देशानंतर मंदिर आणि मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांवर धडक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या भोंगे उतरवण्याच्या कारवाईनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केलं आहे. पत्राच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी योगींचे कौतुक केलं आहे. मात्र राज ठाकरेंच्या या कौतुकानंतर मनसे-भाजपा युतीच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळं येत्या काळात मनसे-भाजपा युती होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

राज ठाकरेंच्या पत्रात काय?

“उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील, विशेषत: मशिदींवरील भोंगे उतरवल्या बद्दल योगी सरकारचे मन:पुर्वक अभिनंदन आणि आभार”, असा शब्दांत राज ठाकरे यांनी योगींचे कौतुक केलं आहे. तसंच, याच पत्राच्या माध्यमातून राज ठाकरेंनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे “आमच्या महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाहीत आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’! महाराष्ट्र सरकारला सदबुद्धी मिळो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना”, असा शब्दांत राज ठाकरेंनी हल्लाबोल केला.

दरम्यान, राज ठाकरेंच्या या वक्तव्यानंतप उत्तर प्रदेशमध्ये भोंगे उतरवण्यात आले. त्यानुसार आता महाराष्ट्रातही ठाकरे सरकार भोंगे उतरवणार का? हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा – यूपीमध्ये मंदिर-मशिदींवरील 4,258 भोंगे हटवले, हजारो लाऊडस्पीकरच्या आवाजावर मर्यादा

First Published on: April 28, 2022 12:02 PM
Exit mobile version