अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवर राज ठाकरेंनी भाजपला लिहिलेलं पत्र ‘स्क्रिप्ट’चा भाग; संजय राऊतांची प्रतिक्रिया

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवर राज ठाकरेंनी भाजपला लिहिलेलं पत्र ‘स्क्रिप्ट’चा भाग; संजय राऊतांची प्रतिक्रिया

अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपचे उमेदवार मुरली पटेल यांनी माघार घ्यावी या मागणीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले होते. तेव्हापासून भाजपं नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांच लक्ष होतं. यानंतर अखेर भाजपने पोटनिवडणूकीतून आपल्या उमेदवाराचा अर्ज मागे घेतला आहे. यासंदर्भात बोलताना अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत भाजपला काज ठाकरेंनी लिहिलेले पत्र हे ‘स्क्रिप्ट’चा भाग असल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत सध्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्या जामीन अर्जावर आज न्यायालयात सुनावणी पार पडली होती. यावेळी मुंबई सत्र न्यायालय परिसरात माध्यमांसोबत चर्चा करताना संजय राऊतांनी भाजप आणि शिंदे गटावर टीकास्त्र डागले आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवर भाजपला राज ठाकरे यांनी लिहिलेले पत्र हे स्क्रिप्टचा भाग आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष 45 हजारांच्या मताधिक्याने जिंकणार होता. त्यामुळेच भाजपने उमेदवार मागे घेतला. पोटनिवडणुकीत पराभवाची चाहूल लागल्याने भाजपने उमेदवारी अर्ज मागे घेतला. भाजपनं या मतदारसंघात वैयक्तिक सर्वे केला, त्यामध्ये त्यांना ऋतुजा लटके विजय होणारचं यासंदर्भात माहिती मिळाली होती.

शिवसेना खासदार संजय राऊत पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी अटकेत आहेत. मुंबईतील गोरेगाव पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा भूखंड आहे. ईडीचा आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम दिले होते. मात्र या जागेतील काही भाग खासगी बिल्डरांना विकल्याचा आरोप होत आहे. प्रवीण राऊत यांनी पत्राचाळीतील नागरिकांचीही फसवणूक केल्याचा आरोप होत आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळीचे 3 हजार प्लॅट बांधकाम करायचे होते. त्यापैकी 672 फ्लॅट येथील भाडेकरूला द्यायचे होते. तर उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायचे होते. पण 2010 मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 25 टक्के शेअर एचडीआयएफला विकले. यानंतर 2011, 2012 आणि 2013 मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खासगी बिल्डर्सना विकल्याचा आरोप होत आहे.


कुणाच्याही कोंबड्यांनी दिवस उगवला तरी.., शरद पवारांची मिश्कील टीका


First Published on: October 17, 2022 4:22 PM
Exit mobile version