शाळा सुरु करण्याबाबत टास्कफोर्सकडून भीती व्यक्त, मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार – राजेश टोपे

शाळा सुरु करण्याबाबत टास्कफोर्सकडून भीती व्यक्त, मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार – राजेश टोपे

आफ्रिकेच्या भागातून येणाऱ्यांसाठी ७२ तासांची RTPCR टेस्ट बंधनकारक, आरोग्यमंत्र्यांची माहिती

राज्य सरकारकडून १७ ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय जारी करण्यात आला आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या निर्णयाची घोषणा केली आहे. मात्र आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शाळा सुरु करण्यासंदर्भात मोठं विधान केलं आहे. राज्यातील कोरोना परिस्थिती पाहता टास्क फोर्सकडून शाळा सुरु करण्याबाबत भीती व्यक्त करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवसांत शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेतील. राज्यात कोरोना संपलेला नाही तसेच डेल्टा प्लसमुळे राज्यात कोरोना वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील हॉटेल आणि उपहारगृहांना १५ ऑगस्टपासून १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी दिली असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

राजेश टोपे यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी राजेश टोपे यांनी म्हटलं आहे की, राज्य सरकारद्वारे अकरावी आणि बारावी संदर्भात ग्रामीण आणि शहरी भागात शाळा सुरु करण्याबबत यापुर्वी निर्णय घेण्यात आला आहे. आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत या विषयावर चर्चा झाली आहे. मुख्यमंत्री, शिक्षण विभाग आणि आरोग्य विभागाची बैठक होणार आहे. या बैठकीत अंतिम निर्णय घेतील. तसेच या बैठकीत टास्क फोर्सचे सदस्यही उपस्थित राहणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

शाळा सुरु करण्याच्या निर्णयावर टास्क फोर्सने भीती व्यक्त केली आहे. अद्यापही कोरोना लसीकरण विद्यार्थ्यांचे झालं नाही. दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचं अद्याप लसीकरण झालं नाही. रिस्क घेऊ नये असे टास्क फोर्सच्या सदस्यांना वाटत आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे टास्क फोर्स सोबत बैठक घेऊन अंतिम निर्णय घेमार आहेत अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

मंत्रिमंळाचा मोठा निर्णय

हॉटेल्स, रेस्टॉरंट, मॉल्स रात्री १० वाजेपर्यंत सुरु राहणार
रेस्टॉरंटमध्ये ५० टक्के उपस्थिती, मॉल्समध्ये दोन डोस घेतलेल्या नागरिकांना प्रवेश
हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्यांचे लसीचे दोन डोस झालेले असणं बंधनकारक
दुकाने रात्री १० वाजेपर्यंत खुली
दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी
लोकलसाठी मासिक आणि तीन महिन्यांचे पास देण्याच्या सूचना
खुल्या प्रांगणातील विवाह सोळ्यांना २०० जणांच्या उपस्थितीची परवानगी
बंद मंगल कार्यालयातील विवाह सोळ्यांना बैठक क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीची परवानगी
सिनेमागृह, नाट्यगृह, धार्मिक स्थळं पुढील आदेशापर्यंत बंद
इनडोअर खेळ सुरु ठेवण्यास परवानगी
खासगी कार्यालयांना २४ तास सुरु ठेवण्याची मुभा
कार्यालयात २५ टक्के क्षमतेनं शिफ्ट्स मध्ये काम कामाच्या सूचना

First Published on: August 11, 2021 9:12 PM
Exit mobile version