‘बाहुबली-२’ नंतर ‘या’ ठिकाणी फ्लॉप ठरला रजनीकांत आणि अक्षय कुमारचा ‘२.०’

‘बाहुबली-२’ नंतर ‘या’ ठिकाणी फ्लॉप ठरला रजनीकांत आणि अक्षय कुमारचा ‘२.०’

'बाहुबली-२' नंतर 'या' ठिकाणी फ्लॉप ठरला रजनीकांत आणि अक्षय कुमारचा '२.०'

भारतातील बॉलिवूडचे मोठे दोन ब्लॉकबस्टर चित्रपट चीममधील प्रेक्षकांची मनं जिंकताना दिसली नाही. व्यवसायिक चित्रपटाच्या प्रवाहात चीनच्या बाजारपेठेत सुपर फास्ट यश मिळवण्याच्या तयारी असणारे हे चित्रपट फ्लॉप झाल्याने या चित्रपटाला मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. रजनीकांत आणि अक्षयकुमार, अभिनीत एस. शंकर यांच्या ‘२.०’ या चित्रपटाने हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने चांगलीच कमाई केली होती. मात्र, ६ सप्टेंबर रोजी चीनमध्ये प्रदर्शित झालेले हे चित्रपट पुर्णतः फ्लॉप ठरले आहेत. या चित्रपटाने चिनी बाजारात पहिल्या आठवड्यात केवळ २२ कोटींची कमाई केली.

‘२.०’ या चित्रपटापुर्वी मे २०१८ मध्ये चीनमध्ये प्रदर्शित झालेला ‘बाहुबली-२’ हा चित्रपट देखील प्रेक्षकांना अधिक भावला नाही. प्रभास अभिनीत एस. एस. राजामौलींचा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर फक्त ५२ कोटी रूपयांची कमाई केली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहांकडे खेचण्यात मात्र अयशस्वी ठरला.

भारतात रेकॉर्डब्रेक कमाई केल्यानंतर चीनमध्ये देखील असाच तुफान प्रतिसाद प्रेक्षक देतील अशी अपेक्षा होती. मात्र जेवढ्या कमाईची अपेक्षा होती तेवढी कमाई या चित्रपटाची झाली नाही. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलीच एन्ट्री केल्यानंतर चीन प्रेक्षकांची उत्सुकता वाढली होती..मात्र, तेथील प्रेक्षकांनी चांगली पसंती न दिल्याने तसेच, चित्रपटाच्या कथेला स्वतःशी जुळवून न घेतल्याने हे चित्रपट चीनमध्ये फ्लॉप ठरले.

First Published on: September 15, 2019 2:09 PM
Exit mobile version