‘या’ पक्षाकडून राजू शेट्टींना पक्षप्रवेशाची खुली ऑफर

‘या’ पक्षाकडून राजू शेट्टींना पक्षप्रवेशाची खुली ऑफर

राजू शेट्टी यांना एका पक्षाकडून पक्ष प्रवेशाचा एक विनंतीवजा प्रस्तावच पाठवण्यात आला आहे.

महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलू लागले आहेत. आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप, राष्ट्रवादी, ठाकरे गट, मनसे, शिंदे गट अशा सर्वच राजकीय पक्षात इन्कमिंग व आऊटगोईंग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कोणत्या ना कोणत्या नेत्याला दुसऱ्या एखाद्या पक्षाकडून ऑफर आलेल्या बातम्या सध्या मोठ्या प्रमाणात येऊ लागल्या आहेत. अशीच एक ऑफर शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना देखील आलीय.

राजू शेट्टी यांना एका पक्षाकडून पक्ष प्रवेशाचा एक विनंतीवजा प्रस्तावच पाठवण्यात आला आहे. याला अद्याप शेट्टी यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. या प्रस्तावामुळे राजू शेट्टी दुसऱ्या पक्षात राहून काम करणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी आता तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समिती प्रमुख के. चंद्रशेखर राव हे महाराष्ट्रातही आपले पाय रोवण्यास प्रयत्न करू लागले आहेत. या संदर्भात त्यांनी अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली. राव यांना ‘केसीआर’ म्हणूनही ओळखलं जातं. पुढील सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधानपदाच्या संभाव्य दावेदारांमध्ये केसीआर यांची गणना केली जाते. तेलंगणाबाहेर प्रथमच केसीआर यांनी रविवारी महाराष्ट्रातील नांदेडमध्ये एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना थेट खुली ऑफरच देऊ केली. केसीआर यांचा एक दूत नुकताच शेट्टी यांना भेटून गेला असल्याचं देखील बोललं जातंय.

 

महाराष्ट्राच्या प्रमुखपदी राजू शेट्टी यांना विराजमान करायचे आहे. भारत राष्ट्र समिती या पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी राजू शेट्टी यांनी कारभार हाती घ्यावा, अशी इच्छा यावेळी केसीआर यांनी बोलवून दाखवली. याबाबतचा विनंतीवजा प्रस्तावच त्यांनी राजू शेट्टींना पाठवला आहे. शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण” अशी साद घालत त्यांनी शेट्टींसह राज्यातील महत्वाच्या शेतकरी नेत्यांशी संपर्क केला असल्याचं समजतंय. निवडणुकीत राजकीय पक्ष आणि नेते जिंकत आहेत, पण लोकांचा पराभव होत आहे. म्हणूनच ‘अबकी बार, किसान सरकार’ असा नारा देत त्यांनी आपला पक्ष महाराष्ट्रात वाढवण्यास सुरूवात केली आहे.

First Published on: February 7, 2023 1:59 PM
Exit mobile version