महापरीक्षेविरुद्ध औरंगाबादमध्ये विद्यार्थी अर्धनग्न अवस्थेत रस्त्यावर

महापरीक्षेविरुद्ध औरंगाबादमध्ये विद्यार्थी अर्धनग्न अवस्थेत रस्त्यावर

महापरीक्षेविरुद्ध औरंगाबादमध्ये विद्यार्थी अर्धनग्न अवस्थेत रस्त्यावर

तलाठीसह इतर परीक्षा ऑनलाईनऐवजी ऑफलाईन घेण्यात याव्या यासोबतच इतर काही मागण्या घेऊन बुधवारी (दि. २६) औरंगाबादमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. यात नाशिक शहरासह जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा समावेश होता. येथील पैठणगेटपासून अर्धनग्न मोर्चा काढत विद्यार्थ्यांनी विभागीय आयुक्तांना भेटून आपल्या मागण्या सादर केल्या.

प्रमुख मागण्या अशा :

– तलाठी पदासाठी असलेली परीक्षा ऑनलाईन न घेता ऑफलाईन घेण्यात यावी.
– पोलीस उपनिरीक्षक पदासाठी असलेली पूर्व परीक्षा संयुक्त पूर्व परीक्षेमधून वगळून स्वतंत्र घेण्यात यावी.
– महाराष्ट्र लोकसेवा आयोग दरवर्षी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करत त्यासोबतच जागा हि जाहीर कराव्यात.
– पोलीस भरतीचे वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर करावे.

First Published on: June 26, 2019 6:24 PM
Exit mobile version