पोलीस उपायुक्ताविरोधात बलात्काराचा गुन्हा

पोलीस उपायुक्ताविरोधात बलात्काराचा गुन्हा

(फोटो सौजन्य : लोकसत्ता)

औरंगाबाद येथील पोलीस उपायुक्तांने एमपीएससी परिक्षेकरता मार्गदर्शन करतो आणि तुला पोलीस खात्यात नोकरी लावतो, असे आमिष दाखवत एका (२२) वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे. राहुल श्रीरामे असे या पोलीस उपायुक्तांचे नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्या मुलीवर बलात्कार करण्यात आला ती पोलीस कर्मचाऱ्याचीच मुलगी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडित तरुणीला एमपीएससीचे परिक्षेचे मार्गदर्शन करतो आणि पोलिस खात्यात नोकरी देतो असे आमिष दाखवून पोलीस उपआयुक्त राहुल यांने चार ते पाच वेळा बलात्कार केला असल्याचे पीडितीने तक्रारीत म्हटले आहे.

तक्रार दाखल करण्यास नकार

नोकरी मिळत नसल्याने तिची फसवणूक केल्याचे पीडितेच्या लक्षात आले. त्यावरुन तिने पोलिसांत गुन्हा दाखल करण्यासाठी धाव घेतली. मात्र पोलिसांनी तिची तक्रार दाखल करुन घेण्यास नकार दिला अखेर तरुणींने व्हॉट्सअॅपद्वारे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत एमआयडीसी पोलिसांनी पोलीस उपायुक्त श्रीरामे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

महिलांवरील अत्याचारामुळे जागतिक स्तरावर भारताची नाचक्की

भारतात महिलांवरील अत्याचार, विनयभंग, बलात्कार, लैंगिक शोषणासारख्या घटना गेल्या वर्षांपासून वाढत आहेत. कठुआ बलात्कार प्रकरण, निर्भया, कोपर्डी येथे झालेल्या बलात्कारांच्या घटनांनी देशाला हादरवून सोडले. त्यामुळे सर्वच स्तरातून भारतावर टिका केली जात आहे. आता काही परदेशी संस्था आणि संघटनादेखील भारतावर टिका करण्याची संधी सोडत नसल्याचे पाहायला मिळत आहे. मंगळवारी लंडनमधील एका संस्थेने जगभरातील महिलांच्या सुरक्षेच्यादृष्टीने एक सर्वेक्षण केले. यामध्ये भारतातील महिला सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. याची पुन्हा एकदा औरंगाबादमध्ये पुनरावृत्ती झाल्याचे समोर आले आहे. औरंगाबादमधील एका पोलीस उपायुक्तांने पोलीसाच्याच मुलीवर बलात्कार केल्याचे उघडकीस आले. यामुळे संपूर्ण पोलीस ठाण्यात खळबळ उडाली आहे.

First Published on: June 27, 2018 5:54 PM
Exit mobile version