रत्नागिरीत रिक्षा-कारचा भीषण अपघात; ७ जण गंभीर जखमी

रत्नागिरीत रिक्षा-कारचा भीषण अपघात; ७ जण गंभीर जखमी

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील पाजपंढरी येथून गुहागर येथील बुधल येथे जाणाऱ्या रिक्षाला चिपळूण-गुहागर मार्गावरील पाटपन्हाळे वावा या ठिकाणी भीषण अपघात झाला. स्वाध्याय परिवार भक्ती फेरीसाठी निघालेल्या भाविकांच्या अॅपे रिक्षाला कारने धडक दिली. या अपघातात दोन लहान मुलांसह एकूण सात जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात प्रभा कमलेश चुणेकर (४०), उत्कर्ष कमलेश चुणेकर (१२), पंकज चोगले (१८) तसेच चालक राजेश नरेश चुणेकर (२७) तसेच अंजली लक्ष्मण धोपावकर (६०) तसेच कार चालक सचिन सतीश ओक (३९) आणि त्यांच्या शेजारी बसलेले सतीश ओक (७३) यांच्या डोक्याला तसेच पायांना जबर दुखापत झाली आहे. (Ratnagiri Guhagar Dapoli Rickshaw Hit By Car 7 Passengers Injured)

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातातील जखमींना उपचारासाठी डॉ. पवार शृंगारतळी ता. गुहागर यांच्याकडे प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी चिपळुण येथे नेण्यात आलेले आहे. हा अपघात शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडला. नववर्षाच्या पूर्वसंध्येला झालेल्या या दुर्दैवी घटनेने वाहनचालक व प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातील जखमींना चिपळूण येथील लाईफ केअर व विठाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. यातील बारा वर्षाच्या मुलाला गंभीर जखमा झाल्या असून त्याच्या पोटरीला दुखापत झाली आहे, तर त्याच्या दोन्ही पायांना फ्रॅक्चर झाले आहे.

दरम्यान, गुहागर येथे स्वाध्याय परिवार भक्ती बैठक असल्याने कमलेश कृष्णा चुणेकर आणि त्यांची पत्नी प्रमा कमलेश चुणेकर, मुलगा उत्कर्ष कमलेश चुणेकर, व पंकज चोगले शेजारी राजेश नरेश चुणेकर यांच्या मालकीच्या अॅपे रिक्षा क्र. एम. एच. ०८ ए.क्यु. २९९७ मधून सकाळी ७ वाजताच्या सुमारास पाजपंढरी येथून निघून सकाळी साडेदहा वाजता शृंगारतळी येथे गेले होते. त्यावेळी स्वाध्याय परिवारातील अंजली लक्ष्मण धोपावकर (६०) यांच्यासह अॅपे रिक्षा आणि बाईक अशा दोन्ही गाड्याने बुधल येथे जात होत्या.


हेही वाचा – मोहालीत निर्माणाधीन इमारतीचे छत कोसळले, ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती

First Published on: December 31, 2022 10:31 PM
Exit mobile version