रत्नाकर मतकरी, नवनाथ गोरेंना साहित्य आकादमी पुरस्कार

रत्नाकर मतकरी, नवनाथ गोरेंना साहित्य आकादमी पुरस्कार

साहित्य आकादमी पुरस्कार

रत्नाकर मतकरी आणि नवनाथ गोरे साहित्य अकादमी पुरस्कार २०१८ चे मानकरी ठरले आहेत. या विषयी साहित्य अकादमी विभागाने आपल्या ट्विट्र हॅण्डलवरुन माहिती दिली आहे. साहित्य क्षेत्रात मौल्यवान कामगिरी करणाऱ्या साहित्यिकांना साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविले जाते. देशभरातील २४ भाषांतील साहित्यिकांना हा पुरस्कार दिला जातो. यावर्षी देशभरातील ४२ साहित्यीकांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. त्यात रत्नाकर मतकरी आणि नवनाथ गोरे या दोन मराठी साहित्यिकांचा समावेश आहे. रत्नाकर मतकरी यांना बाल साहित्य आणि नवनाथ गोरे यांच्या ‘फेसाटी’ कादंबरीसाठी युवा साहित्य आकादमी पुरस्कार जाहीर झााला आहे.

रत्नाकर मतकरींचे साहित्यातील योगदान

रत्नाकर मतकरी यांनी अनेक बालनाटके, एकांकिका, कांदबरी, ललित लेख लिहिले आहेत. त्यांच्या गूढकथा फार लोकप्रिय आहेत. त्यांनी लिहिलेल्या बऱ्याच कादंबरी आणि नाटकांचे रुपांतर चित्रपटांमध्येही झाले आहे. त्यांच्या साहित्याला बऱ्याच पुरस्कारांनीही सन्मानित केले गेले आहे. रत्नाकर मतकरी यांनी बरेच बालनाट्य लिहिले आहेत. त्यातील अचाटगावची अफाट मावशी, अलबत्या गलबत्या, निम्माशिम्मा राक्षस, शाबास लाकड्या असे अनेक बालनाट्य आहेत. त्याचबरोबर गाऊ गाणे गमतीचे हे बालगीतेही प्रचलित आहे.

रत्नाकर मतकरी

नवनाथ गोरे यांना साहित्य आकादमी पुरस्कार

नवनाथ गोरे यांच्या फेसाटी कादंबरीला देखील साहित्य आकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या कादंबरीतून दुष्काळी भागाची विदारक परिस्थिती, ग्रामीण भागाची वस्तुस्थिती आणि शेतकऱ्यांच्या परिस्थितीचे दर्शन घडते.

फेसाटी कादंबरीचे मुखपृष्ठ
First Published on: June 22, 2018 8:25 PM
Exit mobile version